बलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 10 ठार 35 जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

क्वेट्टा- बलुचिस्तानमध्ये आज (शुक्रवार) नमाजच्यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात 10 ठार तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सिनेटच्या उपाध्यक्षांचा समावेश आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

जमात-इ-इस्लामचे नेते गफूर हैदरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'क्वेट्टा शहरातील मुस्तांग भागामध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये सिनेटच्या उपाध्यक्ष मौलाना गफूर हैदरी यांचा समावेश आहे.'

'हैदरी हे मशिदीमधून बाहेर आल्यानंतर त्यांना लक्ष करून आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडविला. या स्फोटामध्ये ते सुद्धा जखमी झाले आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Blast in Balochistan: 10 killed, 35 injured