अफगाणिस्तानातील मशीदीत पुन्हा बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू तर 17 जबर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan: मशीदीत पुन्हा बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू तर 17 जबर जखमी

Afghanistan: मशीदीत पुन्हा बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू तर 17 जबर जखमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबूल: ऑगस्ट महिन्यात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) वारंवार बॉम्बस्फोटाच्या घटना घडताना दिसत आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे चिंतेचं वातावरण असून आता पुन्हा एकदा तिथल्या एका मशीदीत बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतातील एका मशीदीमध्ये बॉम्बस्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा: भारताच्या Covaxin लसीच्या आपत्कालीन वापरास बहरीन NHRAची मान्यता

एएफपी न्यूजला याबाबत माहिती देताना तालिबानी प्रवक्त्यांनी म्हटलंय की, शुक्रवारी स्पिन घार जिल्ह्यातील एका मशीदीमध्ये नमाजच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याच्या माहितीला मी दुजोरा देतो. हा स्फोट दुपारी साधारण दीड वाजता झाला आहे. या बॉम्बस्फोटातील स्फोटके मशीदीत लावण्यात आली होती.

हेही वाचा: आईनं पहिल्यांदाच खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् माय-लेकरं रातोरात..

अगदी काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले होते. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर झालेला स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचं सांगण्यात आलं. घटनास्थळावरून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितलं होतं.

काबूलमध्ये सर्वात धोकादायक स्फोट ऑगस्टमध्ये विमानतळावर घडला होता. अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर देश सोडू पाहणारे लोक मोठ्या संख्येनं काबूल विमानतळावर जमले होते. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले होते.

loading image
go to top