भारताच्या Covaxin लसीच्या आपत्कालीन वापरास बहरीन NHRAची मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covaxin

भारताच्या Covaxin लसीच्या आपत्कालीन वापरास बहरीन NHRAची मान्यता

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोविड-19 लस कोवॅक्सिनला (Covaxin) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी आपत्कालीन वापरासाठी (EUL) मंजुरी दिली. त्यानंतर बहरीनच्या राष्ट्रीय आरोग्य नियामक प्राधिकरणाने (Bahrain National Health Regulatory Authority) भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. याबाबतची माहिती बहरीनच्या भारतीय दूतावासने दिली आहे.

बहरीनमधील भारतीय दूतावासाचे ट्विट

बहरीनमधील भारतीय दूतावासाने ट्विट केले, “बहारिनच्या राष्ट्रीय आरोग्य नियामक प्राधिकरण @NHRABahrain ने भारत बायोटेकद्वारे भारताच्या स्वदेशी विकसित COVID-19 लसीकरण, COVAXIN च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) Covaxin ला आपत्कालीन वापर सुचना (EUL) प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांनी ही मान्यता मिळाली आहे. दरम्यान 96 पेक्षा जास्त देशांनी आतापर्यंत भारताच्या Covaxin आणि Covishield ला मान्यता दिली आहे. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, रशिया आणि स्वित्झर्लंड हे काही देश या 96 राष्ट्रांपैकी आहेत, ज्यांनी भारतातील दोन्ही लसींना मान्यता दिली आहे.

हेही वाचा: हिंदू धर्म आणि हिंदुत्वामध्ये अंतर; राहुल गांधींनी सांगितला काय आहे भेद

भारतातून बहरीनमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी...

या महिन्याच्या सुरुवातीला, WHO ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिली आणि सांगितले की, या लशीमुळे कोविड-19 विरुद्ध 78 टक्के परिणामकारकता आढळून आली. भारताच्या स्वदेशी विकसित COVID-19 लस Covaxin च्या आपत्कालीन वापरास मान्यता देणारा बहरीन हा नवा देश आहे. दूतावासाने जाहीर केले की, भारतातून बहरीनला जाणाऱ्या प्रवाशांकडे भारतातील वैध कोविड लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तसेच बहरीन मधील WHO ने मंजूर केलेल्या लसीसाठी QR कोड स्कॅन करणे आवश्यक राहील. तसेच 10 दिवसांचे विलीगाकरण (Quarantine) तसेच येताना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक असेल.

हेही वाचा: दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC

कोवॅक्सिन लस कोविड 19 च्या लक्षणाविरोधात 77.8 टक्के परिणामकारक

WHO च्या स्वतंत्र सल्लागार समितीच्या तांत्रिक सल्लागार गट (TAG) ने कोवॅक्सिनला EUL दर्जा देण्याची शिफारस केली होती. WHO ने (भारत बायोटेक द्वारे विकसित) #COVAXIN ला आपत्कालीन वापर म्हणून मंजूरी दिली. कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी WHO द्वारे प्रमाणित केलेल्या लसींच्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले,” अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेने ट्विटमध्ये दिलीय. कोवॅक्सिन ही लस कोविड 19 च्या लक्षणाविरोधात 77.8 टक्के परिणामकारक ठरली आणि नवीन डेल्टा वेरिएंटविरोधात 65.2 टक्के संरक्षण करायला परिणामकारक ठरली आहे. भारत बायोटेकच्या कोविड-19 लस कोवॅक्सिनला (Covaxin) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)आपत्कालीन वापरासाठी (EUL) मंजुरी दिली. WHO च्या स्वतंत्र सल्लागार समितीच्या तांत्रिक सल्लागार गट (TAG) ने कोवॅक्सिनला EUL दर्जा देण्याची शिफारस केली होती. जूनमध्ये कंपनीने सांगितले की, त्यांनी फेज 3 चाचण्यांमधून कोवॅक्सिनच्या परिणामकारकतेचे अंतिम परीक्षण केले. भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या दोन लसी आहेत.

loading image
go to top