इस्तंबूलमध्ये स्फोट; 29 ठार, 166 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

इस्तंबूल (तुर्कस्तान) : येथील फुटबॉलच्या मैदानाबाहेर शनिवारी रात्री एक आत्मघाती स्फोट झाला आणि नंतर एका मोटारीमध्ये स्फोट झाला. या स्फोटांमध्ये 29 जण ठार झाले असून 166 जण जखमी झाले आहेत.

इस्तंबूलमधील व्होडोफोन अरेना मैदानात शनिवारी बुरसासपोर आणि बेसिक्‍स्टस या दोन संघामध्ये शनिवारी रात्री फुटबॉलचा सामना होणार होता. त्यामुळे मैदान परिसरात दोन्ही संघांच्या हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. याच वेळी मैदानाच्या बाहेर स्फोट झाले. दोन्ही फुटबॉल संघांनी या स्फोटाचा निषेध केला आहे.

'गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात जखमींपैकी 17 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असून 6 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त मोटारीजवळ मिळालेल्या पुराव्यावरून स्फोट घडविल्याच्या संशयावरून आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. "जे आमच्या देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर हल्ला करत आहेत ते कधीही जिंकणार नाहीत', अशा प्रतिक्रिया तुर्कस्तानचे क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Blast in turkey; 29 killed