निळ्या डोळ्यांचा 'पाकिस्तानी चहावाला' पुन्हा चर्चेत!

वृत्तसंस्था
Tuesday, 6 October 2020

आपल्या निळ्या डोळ्यांनी लाखो युवतींना घायाळ करणारा पाकिस्तानी चहावाला आता पुन्हा चर्चेत आला आहे. इस्लामाबादच्या रस्त्यांवर चहा विकणारा सामान्य मुलगा आता एका कॅफेचा मालक झाला असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

इस्लामाबाद (पाकिस्तान): आपल्या निळ्या डोळ्यांनी लाखो युवतींना घायाळ करणारा पाकिस्तानी चहावाला आता पुन्हा चर्चेत आला आहे. इस्लामाबादच्या रस्त्यांवर चहा विकणारा सामान्य मुलगा आता एका कॅफेचा मालक झाला असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Video: अडीच हजार वर्षापूर्वीची बंद पेटी उघडली अन्...

पाकिस्तानमधील फोटोग्राफर जिया अली या युवतीने २०१६ मध्ये इन्स्टाग्रामवरून एका चहावाल्याचे छायाचित्र व्हायरल केले होते. निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला चहावाला लोकप्रिय झाला होता. शिवाय, निळ्या डोळ्यांच्या चायवाल्यांने त्यावेळी युवतींना घायाळ केले होते. 'पाकिस्तान का चायवाला' या नावाने तो प्रसिद्ध झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेला अरशद खान तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, रस्त्यांवर चहा विकणारा मुलाने स्वतःच्या मालकीचा कॅफे सुरु केला आहे.

इस्लाबादमध्ये अरशदने नुकतेच आपल्या चहा कॅफेचे उद्धाटन केले आहे. 'कॅफे चायवाला रूफ टॉप' असे नाव त्याने त्याच्या कॅफेला दिले आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना तो म्हणाला, 'अनेकांनी मला कॅफेचे नाव अरशद खान असे ठेवण्यास सांगितले. पण, मी त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण चायवाला म्हणून माझी ओळख निर्माण झाली आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blue eyed pakistani chai wala again viral he launched his own cafe at islamabad