

Pakistan Suicide Attack
ESakal
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर घुसवले. ज्यात १२ लष्करी जवानांसह किमान १५ जण ठार झाले. पाकिस्तान लष्कराने शुक्रवारी हे निवेदन जारी केले. हा हल्ला खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका सुरक्षा चौकीवर झाला. पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम शाखेने म्हटले आहे की, "खैबर पख्तुनख्वामधील या आत्मघाती हल्ल्यात १५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ज्यात १२ लष्करी जवान, दोन पोलीस आणि वन विभागाच्या एका माजी सरकारी अधिकाऱ्याचा समावेश आहे."