Ukraine Russia war : ८६ लोकांनी आश्रय घेतलेल्या मारियुपोलमधील मशिदीवर बॉम्ब हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bomb attack on mosque

८६ लोकांनी आश्रय घेतलेल्या मारियुपोलमधील मशिदीवर बॉम्ब हल्ला

युक्रेनमधील (ukraine) मारियुपोल येथील मशिदीला रशियन सैन्याने लक्ष्य केले आहे. या मशिदीत सैनिकांनी बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे. मशिदीत ३४ मुलांसह ८६ नागरिकांनी आश्रय घेतल्याचे युक्रेनच्या युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले. (Bomb attack on mosque)

रशियन आक्रमणकर्त्यांनी मारियुपोल येथील सुलतान सुलेमान द मॅग्निफिसेंट आणि पत्नी रोकसोलाना (हुर्रेम सुलतान) यांच्या मशिदीवर गोळीबार केला. ज्यामध्ये तुर्की नागरिकांसह ८० हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. ज्यात प्रौढ आणि लहान मुले आहेत, असे ट्विट युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

तुर्कीमधील युक्रेन दूतावासाच्या प्रवक्त्याने, मारियुपोलच्या महापौरांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देऊन सांगितले की, रशियन हल्ल्यापासून वाचण्यासाठी मशिदीमध्ये आश्रय घेतलेल्यांमध्ये ३४ मुलांसह ८६ तुर्की नागरिकांचा समावेश आहे. त्यांनी बंदरगाह शहरावर रशियन (russia) हल्ल्यापासून वाचण्यासाठी मशिदीमध्ये आश्रय घेतला होता.

हेही वाचा: आता काँग्रेसचे ममता बॅनर्जीवर टीकास्त्र; ...हे लक्षात ठेवा

मारियुपोलमध्ये एक आठवड्यापासून नागरिक अन्न, पाण्याशिवाय तसेच उष्णता आणि थंडीत अडकून पडले आहेत. मारियुपोलच नाही तर रशियन (russia) लष्कराने युक्रेनच्या (ukraine) पॉश भागात गोळीबार तीव्र केला आहे. रशियाने दक्षिणेकडील मायकोलायव्ह शहरावर जोरदार बॉम्बचा वर्षाव (Bomb attack on mosque) केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. हा हल्ला कॅन्सर हॉस्पिटलवर करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींचे नुकसान झाले. हल्ल्यादरम्यान अनेक रुग्ण रुग्णालयात होते, सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. या हल्ल्यात इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

परिस्थिती अतिशय गंभीर

परराष्ट्र मंत्री मेव्हलुत कावुसोग्लू यांनी शुक्रवारी सांगितले की, तुर्कीने युक्रेनमधून जवळपास १४,००० नागरिकांना बाहेर काढले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने टास या वृत्तसंस्थेने शहर पूर्णपणे वेढल्याचे म्हटले आहे. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे युक्रेनच्या अंतर्गत मंत्रालयाच्या सल्लागाराने एएफपीला सांगितले. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, तेथे आतापर्यंत १,५०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. रशियाने नागरी केंद्रे आणि लोकसंख्येला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :WarRussiaMosqueUkraine