आता काँग्रेसचे ममता बॅनर्जीवर टीकास्त्र; ...हे लक्षात ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adhir Ranjan Chowdhury

आता काँग्रेसचे ममता बॅनर्जीवर टीकास्त्र; ...हे लक्षात ठेवा

तुम्ही काँग्रेसविरोधात का भाष्य करीत आहात? काँग्रेस नसती तर ममता बॅनर्जींसारखी (Mamata Banerjee) माणसे जन्माला आली नसती. हे लक्षात ठेवा. भाजपला खूश करण्यासाठी त्या गोव्यात गेल्या. त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. काँग्रेसला कमकुवत केले. गोव्यात हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Impatient Ranjan Chowdhury) यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर केली.

ममता बॅनर्जी या भाजपला खूश करण्यासाठी आणि भाजपच्या एजंट म्हणून काम करण्यासाठी हे बोलत आहेत. त्या प्रासंगिक राहण्यासाठी अशा गोष्टी बोलतात. वेड्याला प्रत्युत्तर देणे योग्य नाही. भारतभर काँग्रेसचे ७०० आमदार आहेत. विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी २० टक्के काँग्रेसकडे आहेत. त्यांच्याकडे आहे का?, असा सवालही अधीर रंजन चौधरी (Impatient Ranjan Chowdhury) यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत (Assembly election result) चार राज्यांत भाजपच्या विजयानंतर ममतांनी भाजपविरोधी आघाडीसाठी प्रादेशिक पक्षांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. या संदर्भात त्या शुक्रवारी म्हणाल्या होत्या की, काँग्रेसमध्ये तो दम न राहिल्याने त्यांना सोबत ठेवण्यात काही अर्थ नाही. भाजपशी लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. काँग्रेसवर (Congress) अवलंबून राहण्यात अर्थ नाही, असे विधान ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केले होते.

काँग्रेसची विश्वासार्हता संपली

काँग्रेस (Congress) पूर्वी जिंकायची कारण त्यांच्याकडे संघटन होते. परंतु, आता ती सगळीकडे हरवत चालली आहे. त्याला आता जिंकण्यात काही रस दिसत नाही. त्यांची विश्वासार्हता संपली आहे. अनेक मजबूत प्रादेशिक पक्ष असून ते एकत्र आल्याने अधिक प्रभावी होतील, असेही ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या होत्या.