
बाॅम्बस्फोटांनी अफगाणिस्तान पुन्हा एकदा हादरले, ३०पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
काबूल : पुन्हा एकदा शुक्रवारी (ता.२२) अफगाणिस्तानची भूमी बाॅम्बस्फोटांनी हादरली आहे. माहितीनुसार कुंदुज जिल्ह्यातील एका मशिदीत झालेल्या बाॅम्बस्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले. मात्र या घटनेची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) कुंदुज इमाम साहब, कुंदुज जिल्ह्याचे पोलिस प्रमुख हाफिज उमर यांनी टोला वृत्त वाहिनीली सांगितले, की घटना आज दुपारी मावली सिकंदर मशिदीत घडली. मशिदीत बाॅम्बस्फोट झाला. त्यावेळी मशिदीच्या आत काही लोक नमाज पठण करत होते. (Bomb Blast At Mawlawi Sekandar Mosque Of Afghanistan)
हेही वाचा: कोरोनाच्या बूस्टर डोसला उशीरा परवानगी, अदर पूनावाला यांनी व्यक्त केली खंत
अचानक झालेल्या स्फोटामुळे गोंधळा माजला. ३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी सांगितले, की जखमींना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. गुरुवारी (ता.२१) ही उत्तर अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफ शहरात एका शिया मशिदीत भीषण स्फोट झाला होता. यात नमाज पठण करणाऱ्या १० जणांचा मृत्यू, तर ४० जण जखणी झाले होते.
हेही वाचा: ...अन्यथा कोर्टात जाऊ, औरंगाबादेतील राज यांच्या सभेसाठी मनसे आक्रमक
जेव्हापासून तालिबान शासनाने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले आहे, देशात स्फोट आणि हल्ले नेहमी होत आहेत. एका आणखीन घटनेत काबुलमध्ये दोन मुले जखमी झाले होते.
Web Title: Bomb Blast At Mawlawi Sekandar Mosque Of Afghanistan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..