esakal | 'डेल्टा'पासून संरक्षणासाठी तिसरा डोस; Pfizer ला हवी परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

pfizer vaccine

'कॉमिरनेटी' नावाने विकली जाणाऱ्या फायझर-बायोएटेक (Pfizer-BioNTech) लशीला कोरोना महामारी (corona virus) विरोधात प्रभावीपणे लढण्यासाठी तिसऱ्या डोसची आवश्यकता (require third dose) लागणार आहे.

'डेल्टा'पासून संरक्षणासाठी तिसरा डोस; Pfizer ला हवी परवानगी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- 'कॉमिरनेटी' नावाने विकली जाणाऱ्या फायझर-बायोएटेक (Pfizer-BioNTech) लशीला कोरोना महामारी (corona virus) विरोधात प्रभावीपणे लढण्यासाठी तिसऱ्या डोसची आवश्यकता (require third dose) लागणार आहे. लशीचा तिसरा डोस कोरोनाच्या बीटा व्हेरियंटवर अधिक प्रभावी ठरण्याची आशा व्यक्त केली जात आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला होता. तसेच तिसरा डोस भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. (Pfizer BioNTech vaccine may require third dose companies seek approval)

तिसऱ्या डोससाठी परवानगी देण्याची मागणी

फायझर-बायोएनटेकने गुरुवारी घोषणा केलीये की, कोरोना लशीच्या तिसऱ्या डोससाठी रेग्युलेटरी अप्रूवल मागण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, तिसरा डोस अँटीबॉडीचा स्तर कोरोनाच्या व्हेरियंट्सच्या तुलनेत 5 ते 10 पटीने वाढवतो. दोन लशींच्या तुलनेत तिसरा लशीचा डोस अधिक सुरक्षा पुरवतो.

हेही वाचा: Corona Update: देशात गेल्या 24 तासांत 44 हजार 459 कोरोनामुक्त

डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी नाही लस

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपासून वाचण्यासाठी फायझर आणि अॅस्ट्राझेनेका लस कमी प्रभावी आहे. एका अभ्यासामध्ये सांगण्यात आलंय की, ज्यांना याआधी कोरोनाची लागण झालेली नाही आणि नंतर ते डेल्टा व्हेरियंटने प्रभावित झाले. अशा परिस्थितीत लस अशा लोकांच्या शरीरावर जास्त प्रभावी ठरत नाही. Journal Nature' मध्ये प्रकाशित एका अभ्यासात सांगण्यात आलंय की, कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरियंट जगात सर्वाधिक संक्रमण करणारा ठरला आहे.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

कोरोनाची लागण झाल्याने शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीपासून वाचण्यासाठीची क्षमता डेल्टा व्हेरियंटमध्ये आहे. ज्या लोकांना फायझर किंवा अॅस्ट्राझेनेकाचे दोन्ही डोस घेतले आहेत, असे लोक विषाणूपासून वाचू शकतात. लशीचे दोन्ही डोस घेतले असले तरच डेल्टा व्हेरियंट शरीरावर प्रभाव पाडण्याची शक्यता कमी आहे, असं अभ्यासात सांगण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरियंटला सर्वाधिक धोकादायक म्हटलं आहे. भारतातील जवळपास 5 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे व्हेरियंटबाबत चिंता कायम आहे.

loading image