esakal | युरोपातील या दोन देशांच्या सीमा केल्या खुल्या
sakal

बोलून बातमी शोधा

pedro sanchez  and antonio kosta

कोरोनामुळे सुमारे तीन- साडे तीन महिने बंद ठेवलेल्या सीमा पुन्हा खुल्या करण्यास युरोपमध्ये प्रारंभ झाला आहे. स्पेन-पोर्तुगाल सीमा उघडण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला. दरम्यान, युरोपातील ३१ देशांनी बुधवारी लॉकडाउन निर्बंध उठविले असून १५ देशांत बाहेरील नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.

युरोपातील या दोन देशांच्या सीमा केल्या खुल्या

sakal_logo
By
वृत्तसंस्था

एल्वास - कोरोनामुळे सुमारे तीन- साडे तीन महिने बंद ठेवलेल्या सीमा पुन्हा खुल्या करण्यास युरोपमध्ये प्रारंभ झाला आहे. स्पेन-पोर्तुगाल सीमा उघडण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला. दरम्यान, युरोपातील ३१ देशांनी बुधवारी लॉकडाउन निर्बंध उठविले असून १५ देशांत बाहेरील नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील कार्यक्रमास स्पेनचे पेंड्रो सॅंचेझ व पोर्तुगालचे अँटोनिओ कोस्टा हे उभय पंतप्रधान, पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा आणि स्पेनचे राजे फेलिपी हे मान्यवर उपस्थित होते. स्पेनमधील बॅडाजोझ येथील सीमा खुली करण्यात आली. तेथे आधी कार्यक्रम झाला.

सॅटेलाइटने टिपल्या चीनच्या कुरापती, समोर आली धक्कादायक माहिती

सर्व नेत्यांनी मास्क लावले होते. दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले तेव्हा त्यांनी मास्क काढले होते. नंतर या नेत्यांनी मुरीश किल्ला, बॅडाजोझ येथील संग्रहालयाला भेट दिली. त्यानंतर ते २० किलोमीटर अंतरावरील एल्वास येथील १४ व्या शतकातील किल्ला पाहण्यास गेले.

'तू मुलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस'; त्याने पत्नीला मेसेज पाठवला अन्...

युरोपात स्पेनला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सुमारे अडीच लाख रुग्ण व २८ हजार ३०० बळी अशी तेथील आकडेवारी आहे. गेल्या आठवड्यात सुमारे दोन हजार नव्या रुग्णांची भर पडली. युरोपीय महासंघाने १५ देशांतील प्रवाशांसाठी सीमा खुल्या केल्या आहेत. यात चीनची लवकरच भर पडेल, पण अमेरिकी नागरिकांना बहुतांश देशांत आणखी दोन आठवडे प्रवेश मिळणार नाही.

चीनबाबतही देवाणघेवाणसारखे धोरण असेल. त्यासाठी चीनने युरोपीय प्रवाशांना त्यांच्या देशात येण्याची मंजुरी देणे आवश्‍यक आहे.

भारतावर आरोप करणे बंद करा; नेपाळच्या पंतप्रधानांना पक्षातील नेत्यांनीच सुनावलं

युरोप ‘ऑन’

  • कोरोनामुळे फटका तीव्र
  • त्यातून सावरण्यासाठी उन्हाळी पर्यटनावर आशा
  • ग्रीस, इटली व स्पेन या देशांत पर्यटकांची प्रतिक्षा
  • सूर्यप्रकाशाचे चाहते पर्यटन उद्योगात प्राण फुंकण्याची आशा
  • एरवी अमेरिकी पर्यटकांचे प्रमाण मोठे
  • त्यादृष्टिने उन्हाळी सुट्टीचा कालावधी महत्त्वाचा
  • रशिया, ब्राझील, भारत अशा देशांतील प्रवासी मात्र मुकण्याची शक्‍यता
  • दर १४ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन नव्या देशांची भर
loading image