Boris Johnson | बोरीस जॉन्सन यांचं पंतप्रधानपद कायम; विश्वासदर्शक ठराव जिंकला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boris Johnson
बोरीस जॉन्सन यांचं पंतप्रधानपद कायम; विश्वासदर्शक ठराव जिंकला!

बोरीस जॉन्सन यांचं पंतप्रधानपद कायम; विश्वासदर्शक ठराव जिंकला!

कोरोना काळातल्या लॉकडाऊनमध्ये सरकारी कार्यालयात पार्ट्या केल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना विश्वासदर्शक ठरावाचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी हा ठराव जिंकत आपलं पद कायम राखलं आहे.२११ विरुद्ध १४८ मतांनी बोरीस जॉन्सन यांनी हा ठराव जिंकला असून पंतप्रधानपद कायम ठेवलं आहे. (Boris Johnson wins no confidence vote)

पार्टीगेट प्रकरणी स्कॉटलंड यार्ड म्हणजे लंडन महानगर पोलीस मुख्यालयाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर जाहीर झालेल्या अहवालानुसार, जॉन्सन यांच्यासह त्यांची पत्नी केरी सायमंड्स यांचीही चौकशी झाली. डाऊनिंग स्ट्रीट इथल्या कॅबिनेट कक्षामध्ये वाढदिवसाची पार्टी करून लॉकडाऊनचे निर्बंध मोडल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याबद्दल जॉन्सन यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा: पार्ट्यांमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आज विश्‍वासदर्शक ठरावाचा करणार सामना

बोरीस जॉन्सन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत १० डाऊनिंग स्ट्रीट इथं पार्टी केली होती. (Partigate in Britain) यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्याच पक्षातल्या ४० खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यामुळे त्यांच्यावर प्रचंड दबावही होता. पार्टीगेट घोटाळ्यावरून टीका होत असतानाच कंझर्वेटिव्ह पक्षाच्या ५४ खासदारांनी राजीनाम्याची मागणी केली. यामुळे विश्वासदर्शक ठरावाची १५ टक्के आवश्यकता पूर्ण झाली होती.

हेही वाचा: ‘लॉकडाउन पार्टी’बद्दल माफ करा : बोरीस जॉन्सन

अखेर मतदानाआधी बोरीस जॉन्सन यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी आपण पुन्हा पक्षाला विजय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. परिणामी हा विश्वासदर्शक ठराव ते जिंकले आणि आपलं पंतप्रधानपद कायम ठेवलं.

Web Title: Boris Johnson Continued To Be Prime Minister Wins No Confidence Vote

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top