बोरिस जॉन्सन विधान, पुतिन महिला असत्या तर...

Boris Johnson Vladimir Putin russia ukraine crisis
Boris Johnson Vladimir Putin russia ukraine crisisBoris Johnson Vladimir Putin russia ukraine crisis
Updated on

बर्लिन : रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी रशिया दिवसेंदिवस आक्रमण वाढवत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) महिला असते तर हे युद्ध सुरू झाले नसते, असा टोमणा बुधवारी (ता. २९) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी लगावला. (Boris Johnson Vladimir Putin russia ukraine crisis)

जर पुतिन महिला असते तर मला वाटत नाही की त्यांनी असे पुरुषी युद्ध सुरू केले असते. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु, कोणताही करार शक्य नाही. पुतिन शांतता करारासाठी कोणताही प्रस्ताव देत नाहीत आणि झेलेन्स्की करू शकत नाहीत, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) जर्मन ब्रॉडकास्टर जेडडीएफशी बोलताना म्हणाले.

Boris Johnson Vladimir Putin russia ukraine crisis
कन्हैयासारखा गळा चिरणार; नवीन कुमार जिंदालला ठार मारण्याची धमकी

रविवारी ग्रुप ऑफ सेव्हनच्या (G-७) नेत्यांनी पुतिन यांच्या शर्टलेस, उघड्या छातीच्या घोडेस्वारीच्या फोटोची खिल्ली उडवली. बोरिस जॉन्सन आणि कॅनेडियन समकक्ष जस्टिन ट्रूडो एका व्हिडिओमध्ये पुतिन यांच्या फोटोशूटबद्दल विनोद करताना ऐकू येत होते. विनोदाची सुरुवात करीत बोरिस जॉन्सन म्हणाले ‘जॅकेट घातले आहेस? जॅकेट काढू?’. यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले ‘फोटो काढण्यासाठी थांबा’. यावर बोरिस जॉन्सन पुन्हा एकदा म्हणाले ‘आम्ही पुतिन (Vladimir Putin) यांच्यापेक्षा ताकदवान आहोत हे दाखवायचे आहे.’

नाटोने रशियाला (russia) आपल्या सदस्यांच्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी सर्वांत मोठा धोका असल्याचे वर्णन केले आहे. तीस देशांच्या युतीने बुधवारी माद्रिद येथे झालेल्या शिखर परिषदेत निवेदनात ही माहिती दिली. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे शीतयुद्धानंतरच्या युरोपमधील सुरक्षा व्यवस्थेवर कसा नाट्यमय परिणाम झाला हे नाटोच्या घोषणेने अधोरेखित केले आहे. युक्रेनचे (ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी नाटोवर आपल्या देशाला पूर्णपणे मदत न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच रशियाशी लढण्यासाठी अधिक शस्त्रे मागितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com