Poster Boy : अँरेज मॅरेजपासून वाचवा म्हणत... मुलाने शहरभर लावले होर्डिंग्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

london billboards
Poster Boy : अँरेज मॅरेजपासून वाचवा म्हणत... मुलाने शहरभर लावले होर्डिंग्ज

Poster Boy : अँरेज मॅरेजपासून वाचवा म्हणत... मुलाने शहरभर लावले होर्डिंग्ज

लग्नाच्या बाबतीत लोकं सावधपणे पाऊले उचलतात. खटपटी तर खूपच करतात. कारण आयुष्यातील तो महत्वाचा निर्णय असतो. काही लोकं अँरेंज मॅरेज (Arrange Marriage) करण्याला तर काही लव्ह मॅरेजला प्राधान्य देतात. पण एक मुलगा त्याच्या लग्नामुळे खूप चर्चेत आलाय. या मुलाने शहरभर होर्डिंग्ज लावली आहेत. त्या होर्डिंग्जवर मला अँरेंज मॅरेजपासून वाचवा असे लिहिले आहे. वर स्वत:चा फोटोही लावला आहे,

२९ वर्षाचा मोहम्मद मलिक हा लंडन येथे राहणारा असून त्याने बकिंगहॅम शहरात जागोजागी असे 20 फुटांचे होर्डिंग्ज लावले आहे. त्याचे होर्डिंग्ज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेकांनी शेअऱ केले आहे. या मुलाने ट्विटरवही ते शेअऱ केले आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO

वेबसाईटवर दिली माहिती

त्याने एक वेबसाईट सेटअप केली असून त्यावर त्याने स्वत:ची सगळी माहिती शेअर केली आहे. त्यात आपल्या आवडी-निवडी, वय, करिअर आदी गोष्टी शेअर केल्या आहेत. मलिकने युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून जर कोणी माझ्याशी लग्न करण्यास उत्सुक असेल तर फॉर्म भरा असे सांगितले आहे. तो म्हणतो की तो अ‍ॅरेंज्ड मॅरेजच्या विरोधात नाही पण माझ्या आवडीची एखादी व्यक्ती मिळाली तर खूप छान होईल.

हेही वाचा: दोन डोसनंतरही Omicron चा धोका; शास्त्रज्ञांना आढळली 2 नवीन लक्षणं

मोहम्मदविषयी...

मोहम्मद मलिकने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तो व्यवसायाने इनोव्हेशन सल्लागार आणि उद्योजक आहे. त्यांनी ही वेबसाईट फक्त त्यांच्या लग्नासाठी तयार केली आहे, या वेबसाईटचे नाव Findmailkawife.com आहे. सध्या त्याचे हे मोठे पोस्टर व्हायरल होताच लोकांनी त्याची मजा घ्यायला सुरुवात केली. पण गंमत म्हणजे मोहम्मद लोकांच्या पोस्ट स्वतः ट्विटरवर शेअर करत आहे.

हेही वाचा: 'संरक्षणासाठी कावळ्यासह जंगली पक्ष्यांना गोळ्या घालता येणार'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top