नशेत चालू लागला; महिनाभर नुसताच चालतोय...

boy from scotland started walking to overcome hangover ended up walking 800 km
boy from scotland started walking to overcome hangover ended up walking 800 km

लंडन : एका 20 वर्षीय युवक मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी क्लबमध्ये गेला होता. पार्टीदरम्यान त्याने नशा केली. नशेचा हॅंगओव्हर झाल्यानंतर तो चालू लागला. गेल्या एक महिन्यापासून तो चालतच आहे.

बार्ने रुल असे युवकाचे नाव आहे. स्कॉटलंडमधील युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये तो इतिहास व राज्यशास्त्राचे शिक्षण घेत आहे. सात सप्टेंबर रोजी रात्री मित्रांनी पार्टी करण्याचे ठरवले. मित्रांसोबत तो क्लबमध्ये गेला. क्लबमध्ये गेल्यानंतर त्यांनी दारू घेतली. बार्ने रुलला नशा चढली. क्लबच्या बाहेर आल्यानंतर त्याने चालायला सुरवात केली. रात्रभर तो चालतच राहिला. मित्रांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, नशेमध्ये असल्यामुळे कोणाचे ऐकत नव्हता. फक्त चालायचे एवढेच त्याने ठरवले.

नशा उतरल्यानंतरही त्याने चालणे चालूच ठेवायचे ठरवले. गेल्या एक महिन्यापासून तो नुसताच चालत आहे. घटनास्थळापासून त्याने 800 किलोमीटर अंतर कापले आहे. सध्या तो स्पेनमध्ये दाखल झाला आहे. दिवसाला तो 32 किलोमीटर चालतो. बार्ने म्हणाला, 'मला चालायला आवडते. परंतु, मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर नशा चढली आणि चालायला सुरवात केली. नशेत 20 किलोमीटर चालत गेलो. नशा उतरल्यानंतर थांबायचे नाही असे ठरवले. तेंव्हापासून मी चालत आहे. फ्रान्समध्ये अनेकांनी माझे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. प्रवासादरम्यान वेगवेगळे नागरिक भेटतात. माझ्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी माझा शोध घेतला आहे. त्यांनीही मला चालण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आता फक्त मी चालतच राहणार आहे...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com