मेंदूतील चिप करेल आता उपचारांना मदत; डुकरावर केला पहिला प्रयोग

पीटीआय
Sunday, 30 August 2020

अवकाशात पहिले खासगी अवकाशयान सोडणारे हरहुन्नरी उद्योजक एलॉन मस्क यांनी आज एका घोषणेद्वारे नवीन क्षेत्राची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. दोन महिन्यांपासून एक डुकराच्या मेंदूमध्ये नाण्याच्या आकाराची संगणकीय चिप बसवून त्याचे परिणाम अभ्यासल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अशाच प्रकारचे रोपण करून भविष्यात मानवाच्या मेंदूशी संबंधित आजार बरे करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

न्यूयॉर्क - अवकाशात पहिले खासगी अवकाशयान सोडणारे हरहुन्नरी उद्योजक एलॉन मस्क यांनी आज एका घोषणेद्वारे नवीन क्षेत्राची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. दोन महिन्यांपासून एक डुकराच्या मेंदूमध्ये नाण्याच्या आकाराची संगणकीय चिप बसवून त्याचे परिणाम अभ्यासल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अशाच प्रकारचे रोपण करून भविष्यात मानवाच्या मेंदूशी संबंधित आजार बरे करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एलॉन मस्क यांच्या मेंदूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या न्यूरालिंक या स्टार्टअपने हा प्रयोग केला आहे. त्यांनी एका नाण्याच्या आकाराची संगणकीय चिप तयार करून तिला हजारो इलेक्ट्रॉड जोडले होते. याद्वारे मेंदूतील हालचालींचा अभ्यास करता येतो, असा कंपनीचा दावा आहे. या चिपचा आणखी विकास करून त्याचे मानवी मेंदूत रोपण केल्यास अल्झायमर, चक्कर येणे, मणक्याचे आजार आणि मेंदूशी निगडीत अनेक आजारांवर उपचार करणे सोपे जाऊ शकते.  मानवी मेंदूला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यासाठीही या चिपचा वापर करता येईल, असा मस्क यांच्या कंपनीचा दावा आहे. डुकरावर केलेल्या प्रयोगाचा निष्कर्ष अद्याप सांगण्यात आलेला नसला तरी यादृष्टीने सुरू असलेल्या संशोधनाला मस्क यांनी बळ दिले असल्याचे मानले जात आहे.

कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या शहरातील शाळा अनलॉक होणार

संशोधकांनी आतापर्यंत मेंदूचा अभ्यास करताना आधी प्राण्यांवरच प्रयोग केले आहेत. सुरक्षिततेसाठी मानवावर सरसकट प्रयोगांना परवानगी नाही. त्यामुळे मस्क यांच्या या प्रयोगाच्या यशस्वी होण्याची आशा अनेकांना आहे. 

हॅरिस यांच्यापेक्षा इव्हांका राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र - डोनाल्ड ट्रम्प

असे आहे उपकरण
आठ मिलिमीटर, म्हणजे बोटाच्या टोकाहूनही आकाराने छोटे असलेले हे उपकरण मेंदूशी केसापेक्षा बारीक अशा हजारो वायरींनी जोडलेले असते. शरीराच्या हालचाली आणि संवेदनांशी निगडीत असलेल्या मेंदूच्या भागामध्ये त्याचे रोपण केले जाते. एक प्रकारचा रोबो असलेले हे यंत्र पूर्णपणे काढूनही टाकता येते. मेंदूच्या हालचाली आणि कार्य यांच्यावर लक्ष ठेवून त्याला बळ देण्याचा या उपकरणाचा उद्देश आहे.

हे वाचा - भारतीय वंशांच्या हेर नूर यांचा ब्रिटनमध्ये सन्मान; दुसऱ्या महायुद्धात धाडसी कार्य

या उपकरणामुळे अनेक आजार दूर करणे शक्य आहे. स्मृतीभ्रंश, ऐकू न येणे असे आजार दूर करता येण्यासारखे आहेत.
- एलॉन मस्क, उद्योजक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brain chip will now help treat the first experiment done on pigs