ब्राझीलमध्ये भीषण दुर्घटना; धबधब्यात कडा कोसळून ७ जण ठार; VIDEO VIRAL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राझीलमध्ये भीषण दुर्घटना; धबधब्यात कडा कोसळून ७ जण ठार

धबधब्यात कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३२ जण जखमी झाले असून २० हून अधिक बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.

ब्राझीलमध्ये भीषण दुर्घटना; धबधब्यात कडा कोसळून ७ जण ठार

ब्राझिलिया - धबधब्यात कडा कोसळून ब्राझीलमध्ये (Brazil) भीषण दुर्घटना घडली आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३२ जण जखमी आहेत. याशिवाय तिघेजण बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धबधब्याजवळ असलेला पूर्ण कडाच कोसळताना दिसतो. एका इमारतीएवढा दगडी कडा कोसळत असताना धबधब्यात दोन बोटी होत्या. त्यातील काही लोकांचा मृत्यू झाला तर अद्याप काहींचा शोध घेतला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साओ पाउलोच्या उत्तरेला जवळपास ४२० किमी अंतरावर Furnas Lake आहे. सी ऑफ मिनाज असंही या ठिकाणाला ओळखलं जातं. याठिकाणी शनिवारी सांयकाळी ही दुर्घटना घडली. गेल्या काही काळात झालेल्या पावसामुळे इथं दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा: संसर्गाची तिसरी लाट ओमिक्रॉनमुळेच; तज्ज्ञांचा अंदाज

Minas Gerais इथं ही दुर्घटना घडली. धबधब्याच्या कड्याचे काही दगड खाली कोसळले. यावेळी धबधब्यात एक बोट होती. यातील ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिथे डायव्हर्स आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने इतरांचा शोध घेतला जात आहे. अंदाजे २० जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची यादी चेक केल्यानंतरच नेमकी संख्या स्पष्ट होऊ शकेल असं म्हटलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :brazil
loading image
go to top