Brazilian police helicopters hover over Rio de Janeiro during the country’s largest anti-drug raid, leaving over 130 people dead amid violent clashes.
esakal
Brazil Drug Raid : पोलिसांची ड्रग्ज माफियांवर सर्वात मोठी कारवाई, छाप्यादरम्यान १३० जणांचा मृत्यू; सुप्रीम कोर्टाने अहवाल मागवला
Summary
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवला आहे.
संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांनी या घटनेला “नरसंहार” म्हटले आहे.
पोलिसांचा दावा आहे की "रेड कमांड" टोळीने प्रथम गोळीबार व बॉम्बहल्ले केले.
ब्राझीलमध्ये पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली. मंगळवारी सकाळी २,५०० पोलिस अधिकाऱ्यांनी एकाच वेळी हेलिकॉप्टरचा वापर करून राजधानी रिओ दि जानेरोच्या अनेक भागात छापे टाकले.या छाप्यादरम्यान आतापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात चार पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नागरिक पोलिसांवर अतिरेकी बळाचा वापर केल्याचा आरोप करत आहेत आणि राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करत आहेत. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयानेही संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे.

