
ब्राझीलमध्ये एका २० वर्षीय मुलीचा धावत्या बसमध्ये धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. सार्वजनिक बसमधून प्रवास करणारी मुलगी अचानक बेशुद्ध पडली आणि खाली पडली. त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पण त्यानंतर जे घडले ते आणखी गूढ होते. मृत्यूनंतर मुलीच्या मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या शरीरावर सुमारे दोन डझन आयफोन अडकलेले आढळले. मुलीने टेपच्या मदतीने हे मोबाईल फोन तिच्या शरीरावर चिकटवले होते, जे पाहून अधिकारी आश्चर्यच व्यक्त करत आहेतय