Brett Sylvia : इराण युद्धाची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला केले बडतर्फ

Pentagon Leak : प्रकरण पुढील कायदेशीर कारवाईसाठी अमेरिकेच्या न्याय विभागाकडे सोपवण्यात आले असून तपास अद्याप सुरू आहे. पेंटागॉनने संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी प्रशासकीय कारवाई केल्याचे सांगितले.
Brett Sylvia Removed From Pentagon J5 Role

Brett Sylvia Removed From Pentagon J5 Role

esakal

Updated on: 

Brett Sylvia Removed From Pentagon J5 Role : अमेरिकेच्या संरक्षण विभागात गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल ब्रेट सिल्व्हिया यांना पदावरून हटवले आहे. इराण आणि रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित अत्यंत गोपनीय लष्करी माहिती पत्रकारांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत सिल्व्हिया यांची भूमिका संशयास्पद आढळल्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण अमेरिकेच्या न्याय विभागाकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांबाबतचा तपास अद्याप सुरू आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...