
ब्रिटनमध्ये आज नव्या वर्षाच्या पहाटे नव्या युगाची द्वारे खुली झाली. ब्रिटन युरोपिय समुदायातून (ईयू) आता औपचारिकरीत्या बाहेर पडला आहे. युरोपिय समुदायाच्या बांधिलकीतून ब्रिटन गुरुवारी रात्री ११ वाजता मुक्त झाला. प्रवास, व्यापार आणि सुरक्षेसंबंधी स्वतंत्र नियम लागू झाले.
लंडन - ब्रिटनमध्ये आज नव्या वर्षाच्या पहाटे नव्या युगाची द्वारे खुली झाली. ब्रिटन युरोपिय समुदायातून (ईयू) आता औपचारिकरीत्या बाहेर पडला आहे. युरोपिय समुदायाच्या बांधिलकीतून ब्रिटन गुरुवारी रात्री ११ वाजता मुक्त झाला. प्रवास, व्यापार आणि सुरक्षेसंबंधी स्वतंत्र नियम लागू झाले.
आर्थिक स्तरावरील विभाजनाने ‘ईयू’चे आकुंचन झाले आहे तर ब्रिटन मुक्त झाला आहे. मात्र या अस्थिर जगात तो एकाकी झाल्याचे मानण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धापासून ब्रिटन युरोपिय समुदायाचा भाग होता. ‘ब्रेक्झिट’ करारामुळे ते वेगळे झाले असून ‘देशासाठी हा अद्भूत क्षण आहे,’ अशी भावना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नव्या वर्षांच्या शुभेच्छापर व्हिडिओ संदेशात व्यक्त केली. ‘ब्रेक्झिट’मधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनला स्वातंत्र्य मिळाले असून अनेक गोष्टी वेगळ्या व चांगल्या प्रकारे करण्याची क्षमताही आपल्याकडे आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ब्रिटनच्या जनतेने २०१६ मध्ये मतदानाने युरोपिय समुदायातून बाहेर पडण्याचा कल व्यक्त केला होता. गेल्या ११ महिन्यांपासून हा करार ‘ईयू’च्या व्यापारसंबंधीच्या नियमांत अडकलेला होता. दोन्ही गट भविष्यातील त्यांच्या आर्थिक समझोत्यावर चर्चा करीत होते. नाताळाच्या आदल्या दिवशी या करारावर सहमती दर्शविण्यात आली. संसदेने बुधवारी (ता.२८) मंजुरी दिल्यानंतर ब्रिटनमध्ये हा कराराचे कायद्यात रूपांतर झाले आणि अखेर साडेतीन वर्षानंतर ३१ जानेवारीला ब्रिटनने अधिकृतरीत्या २७ सदस्य देशांचा समावेश असलेले ‘ईयू’चे राजकीय आर्थिक व्यासपीठ सोडले.
ऑस्ट्रेलियाने बदलला राष्ट्रगीतातला एक शब्द; असं करण्यामागे नेमकं कारण काय?
घंटेचा निनाद
कोरोनामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन असल्याने काल रात्री हा क्षण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यासाठी संधी नागरिकांना मिळाली नाही. पण या आनंदाप्रीत्यर्थ संसदेतील भव्य ‘बिग बेन’ घंटा ११ वेळा वाजविण्यात आली.
Time Travel : 2020 रिटर्न; ते 1 जानेवारीतून गेले 31 डिसेंबरमध्ये!
असे होणार बदल
ब्रिटन एक मित्र आणि सहयोगी देशाच्या रूपात युरोपीय समुदायाबरोबर असेल.
- इमॅन्युअल मॅक्रॉन, अध्यक्ष, फ्रान्स
Edited By - Prashant Patil