esakal | Time Travel : 2020 रिटर्न; ते 1 जानेवारीतून गेले 31 डिसेंबरमध्ये!
sakal

बोलून बातमी शोधा

time

कोरोना महामारीमुळे 2020 वर्ष सगळ्यांनाच लक्षात राहिल

Time Travel : 2020 रिटर्न; ते 1 जानेवारीतून गेले 31 डिसेंबरमध्ये!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे 2020 वर्ष सगळ्यांनाच लक्षात राहिल. चीनच्या वुहान शहरात सापडलेल्या कोरोना विषाणूने पाहतापाहता सर्व जगात थैमान घातले. 2020 मध्ये अनेक संकटांचा सामना केलेल्या लोकांना हे वर्ष कधी संपतं असं झालं होतं. एकदाचं 2020 वर्ष सरलं असून 2021 मध्ये आपण प्रवेश केला आहे. पण, 2021 मध्ये प्रवेश केलेल्या काही लोकांना पुन्हा 2020 मध्ये परत गेल्याचा विचित्र अनुभव घ्यावा लागला आहे.

PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा

गुआम (GUAM) हे पश्चिम पॅसिफिकमधील अमेरिकेचे एक बेट. गुआमने 2021 मध्ये प्रवेश केला म्हणजे या बेटावर 2021 च्या जानेवारीचा पहिला दिवस सुरु झाला होता. येथील अमेरिकेचे एक विमान (1st, 2021, 08:15 वाजता) अमेरिकेच्याच हुआई राज्याकडे निघाले. जेव्हा या विमानातील प्रवासी हुआईची राजधानी होनोलुलू येथे उतरले तेव्हा त्यांना एका विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. कारण, ते ज्या ठिकाणी उतरले होते, त्याठिकाणीची तारीख होती 31 डिसेंबर 2020 आणि वेळ होती 19.20. म्हणजे त्याठिकाणी 2021 सुरु व्हायला जवळजवळ 5 तास शिल्लक होते. 

2020 कधी संपतं आणि आपण नव्या वर्षात जातो, असं सगळ्यांना झालं होतं. पण, गुआमातून निघालेल्या प्रवाशांनी 2021 चा आनंद साजरा केला, पण पुन्हा त्यांना 2020 च्या वर्षात परत जावं लागलं. Flightradar24 ने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन यासंबंधी ट्विट केलं आहे.  Flightradar24 स्विडिशमधील कंपनी असून व्यावसायिक विमानांची रिअल टाईम ट्रॅकिंगची माहिती मॅपवर दाखवत असते. 

पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांशी संबंधीत 72 कोटींच्या मालमत्तेवर टाच

असं का घडलं?

जगातील वेगळवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे टाईम झोन असतात. याचा अर्थ भारतात जो वेळ आहे, तोच अमेरिकेत नसतो. आपल्याला माहितीये की पृथ्वी गोल आहे आणि ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. जगातील व्यवहारांसाठी सोयीचे व्हावे यासाठी पृथ्वीला वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरण्यासाठी म्हणजे 360 डिग्री पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा वेळ घेते. त्यामुळे वेज्ञानिकांनी पृथ्वीला 24 भागांमध्ये विभागले आहे. दर 60 मिनिटाला पृथ्वी 15 डिग्री फिरते. हे झोन पश्चिम पॅसिफिकमधून सुरु होतात आणि पश्चिमेकडे वाढत जातात. त्यामुळे नवा दिवस सगळ्यात आधी पूर्व देशामध्ये सुरु होता. त्यामुळे नवा वर्षाचे सेलिब्रेशन करण्याची संधी सगळ्यात आधी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांना मिळत असल्याचं आपण पाहतो.  

loading image