ब्रिटनची युक्रेनला पुन्हा मदत; 6 हजार मिसाईल्स, 25 दशलक्ष पाऊंड सैन्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boris johnson

ब्रिटनची युक्रेनला पुन्हा मदत; 6 हजार मिसाईल्स, 25 दशलक्ष पाऊंड सैन्यासाठी

रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. मागच्या महिन्यात याच तारखेला रशियाने युक्रेनविरोधात (Ukraine) हल्लाबोल केला होता. 24 फेब्रुवारीच्या रात्री दोन वाजल्यापूसन ते 22 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत आतापर्यंत 977 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात 1594 लोक जबर जखमी झाले आहेत. मात्र, हा आकडा याहून कितीतरी पटीने अधिक असू शकतो, असं संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटलंय. (Russia Invasion) या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आज युक्रेनला मदत करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा: रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन

ब्रिटनने युक्रेनला याआधीच 4 हजार NLAW आणि जेव्हलिन मिसाईल्स दिल्या आहे. त्याव्यतिरिक्त अतिरिक्त 6 हजार मिसाईल्स ब्रिटन देणार आहे. यासोबतच प्राणघातक बचावात्मक अशी लष्करी मदतही करण्यात येणार आहे, ज्यामध्ये स्टारस्ट्रीक अति वेगाविरोधातील मिसाईल्सचा समावेश आहे. यामुळे युक्रेनियन लोकांना स्वत:चं संरक्षण करण्यास मदत मिळेल. (UK PM Boris Johnson) यासोबतच बोरिस जॉनसन यांनी भरघोस आर्थिक मदतही देऊ केली आहे. यावेळी बोरिस जॉनसन यांनी म्हटलंय की, आम्ही युक्रेनियन सैन्यासाठी 25 दशलक्ष पाऊंडची आर्थिक मदत देत आहोत. (Ukrain)

तसेच रशिया आणि युक्रेनमधील युद्धासंदर्भात चुकीची माहितीही प्रसारित होत आहे. चुकीच्या माहितीला दोन हात करण्यासाठी ब्रिटनकडून बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी अतिरिक्त 4.1 दशलक्ष पाऊंडचीही मदत करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात या युद्ध गुन्ह्यांच्या तपासासाठी नवीन आर्थिक आणि पोलिस समर्थन देखील देणार आहे.

हेही वाचा: महापालिकेत घोटाळेच घोटाळे! मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु: फडणवीस

अमेरिकेची रशियावर टीका

‘‘युक्रेनमधील नागरी लक्ष्यांवर हल्ले करून व अखंड हिंसाचारातून रशियाने अनेकांचे बळी घेणाऱ्या व विध्वंस केला आहे. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखालील रशियन फौजांनी युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे केले आहेत,’’ अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी बुधवारी (ता.२४) केली. म्हणाले, ‘‘याने गेल्या महिन्यात युक्रेनवर हल्ले करीत निवासी इमारती, शाळा, रुग्णालये अशा नागरी वास्तूंना लक्ष्य केले. सध्या उपलब्ध झालेल्या माहितीचे अमेरिकी सरकारने विश्‍लेषण केले आहे. त्यानुसार रशियन फौजांनी युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे केले असल्याचे मी जाहीर करतो. नागरिक व गुप्तचर यंत्रणांच्या स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीचे काळजीपूर्वक विश्‍लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.’’

Web Title: Britain Aid To Ukraine 6000 Missiles 25 Million Pounds For Ukrainian Military

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :britainRussiaUkraine
go to top