ब्रिटन आणि अमेरिकेने एकत्रपणे नेतृत्व करावे

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

थेरेसा मे : भारताच्या विकासाबद्दलही आनंद व्यक्त

वॉशिंग्टन: ब्रिटन आणि अमेरिकेने एकत्रपणे नेतृत्व करत जागतिक सुरक्षेसाठी वेगळी भूमिका बजावणे आवश्‍यक आहे, असे मत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज अमेरिकेत आवाहन केले. भारतासारख्या मित्रदेशांचा जागतिक राजकारणात दबदबा वाढत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

थेरेसा मे या सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या परिषदेमध्ये त्यांचे आज भाषण झाले. त्या म्हणाल्या, ""जागतिक पातळीवर सर्वत्र दहशतवाद्यांचा उदय वेगाने होत आहे. अशा वेळी अमेरिका आणि ब्रिटन यांनी नेतृत्वाची भूमिका स्वीकारणे आवश्‍यक आहे. दोन्ही देशांतील सरकार नवे असून, दोघांनी आपला आत्मविश्‍वास पुन्हा प्राप्त केला आहे. ही केवळ संधीच नसून, नव्या युगात विशेष सहकार्य करण्याची ही जबाबदारी आपल्यावर आहे. जगामध्ये सर्वत्र अस्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे. नवे शत्रू, विशेषत: मूलतत्त्ववादी इस्लामिक दहशतवादी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत. चीन आणि रशियासारखे देश जागतिक राजकारणात आक्रमक भूमिका घेत आहेत. याच वेळेस भारतासारखे लोकशाहीवादी मित्रदेश वेगाने आर्थिक विकास घडवून आणत असल्याने त्यांचे स्वागत करायला हवे. लाखो लोकांना गरिबीतून वर काढले जात असून, आपल्या कंपन्यांसाठी नवी बाजारपेठ निर्माण होत आहे.''

Web Title: Britain and the United States to lead together