देश लॉकडाऊन असताना पार्टी; ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

boris johnson
boris johnson

जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिअंटने जगभरात चिंता वाढवली आहे. दरम्यान, २०२० च्या सुरुवातीला केलेल्या एका चुकीबद्दल ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी माफी मागितली आहे. जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन असताना पार्टीमध्ये सहभाग घेतला होता. यावरून त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. यावर जॉन्सन यांनी म्हटलं की, काही गोष्टी माझ्या सरकारला योग्यप्रकारे सांभाळता आल्या नाहीत.

बोरिस जॉन्सन यांनी ड्राउनिंग स्ट्रीटमधील त्यांच्या निवासस्थानी सहकर्मचाऱ्यांसह पार्टी केल्यानं लोकांसह विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर बोरिस जॉन्सन यांनी संसदेत बुधवारी मान्य केलं की, मे २०२० मध्ये गार्डनमधील पार्टीत होते. पण ती पार्टी कामकाजाशी संबंधित कार्यक्रमाचा भाग होती असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा परिस्थिती जॉन्सन यांनी पत्नी कॅरी यांच्यासह गार्डनमध्ये झालेल्या पार्टीत सहभाग घेतला होता. यामुळे कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाले होते. जवळपास १०० जणांना ईमेलच्या माध्यमातून पार्टीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.

boris johnson
महिला 'ब्लाइंड डेट'च्या घरी गेली अन् शहरात लागलं लॉकडाऊन, पुढे मग..

जॉन्सन यांनी ब्रिटनच्या संसदेत खासदारांसमोर माफी मागताना म्हटलं की,'मला माफी मागायची आहे. मी पार्टीत आलेल्या सर्व लोकांना परत पाठवायला हवं होतं.' या वादानंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आठवड्याच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात जॉन्सन पहिल्यांदाच सार्वजनिक रित्या उपस्थित राहिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com