महिला 'ब्लाइंड डेट'च्या घरी गेली अन् शहरात लागलं लॉकडाऊन, पुढे मग.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china corona

महिला 'ब्लाइंड डेट'च्या घरी गेली अन् शहरात लागलं लॉकडाऊन, पुढे मग..

समजा तुम्ही पहिल्याच ब्लाइंड डेटवर (Blind Date) एका व्यक्तीच्या घरी जेवायला गेला आहात आणि त्याच दिवशी तुमच्या शहरात लॉकडाऊन (Lockdown) लागू झाले आणि आता तुम्ही त्या व्यक्तीच्या घराबाहेरच पडू शकत नाहीयेत, तुम्हाला त्या अनोळखी व्यक्तीच्या घरात राहावे लागत आहे. एका चिनी महिलेच्या बाबतीत हेच घडले आहे. ती महिला तब्बल चार दिवस तिच्या डेटच्या घरी अडकून पडली, पण यानंतर झालं ते आणखीनच मजेदार आहे..

लॉकडाऊन झाल्यानंतरचे तिच्या 'ब्लाइंड डेट' (अनोळखी व्यक्तीसोबत डेट) चे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चीनमध्ये सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यापासून मध्य चीनमधील झेंगझोऊ शहरात 100 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या बुधवारी शहरातील काही भागात लॉकडाऊन लागू करण्यात आले तेव्हा ही महिला तिच्या 'ब्लाइंड डेट'च्या घरी जेवण करत होती.

मिडीया रिपोर्टनुसार, ही महिला झेंगझोऊ शहरात पोहोचली आणि शहरात कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले, आणि त्यानंतर शहरात लॉकडाऊन लागू झाला, त्यानंतर ही महिली शहर सोडून जाऊ शकला नाही. त्यामुळे तीला या अनोळखी पुरुषासोबत राहावे लागले

'वांग म्हणाली की, ती तिच्या संभाव्य प्रियकराला भेटण्यासाठी आठवड्याभराच्या सुट्ट्या घेऊन आली होती. ती म्हणाली की 'माझे वय होत आहे, त्यामुळे कुटुंबीयांनी 10 पुरुषांना भेटण्यास सांगितले होते. पाचव्या व्यक्तीने मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले होते. आणि लॉकडाऊन लागले तेव्हापासून, वांग लॉकडाऊन दरम्यान तिच्या दैनंदिन दिनचर्येचे छोटे व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट करत होती, लॉकडाऊनमुळे वांगला ज्या व्यक्तीच्या घरी राहावे लागले त्या काळात वांगने या सर्व दिवसांचे काही छोटे व्हिडिओही बनवले आहेत.

हेही वाचा: ओमिक्रॉन सामान्य सर्दी-खोकला नाही; केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा

वांगने या अनोख्या डेटबद्दल मिडीयाला सांगितले की, तिला बोलका नवरा हवा आहे, मात्र ती ज्याच्यासोबत लॉकडाऊनमध्ये अडकली आहे तो अगदी लाकडी पुतळ्यासारखा निःशब्द आहे याशिवाय, त्याच्याबद्दल इतर सर्व काही चांगले आहे. तसेच त्याने बनवलेलं जेवण सामान्य होतं, पण तो स्वयंपाक करण्यास उत्सुक आहे जी चांगली गोष्ट आहे असं ती म्हणाली. वांगने या व्हिडिओमध्ये त्याचे वय आणि त्याची ओळख उघड केलेली नाही.

या व्हिडीओना सोशल मिडीयामध्ये खूप पसंती मिळत असून चीनमधील ट्विटर सारख्या एका सोशल मीडिया साईट Weibo वर पोस्ट केलेल्या त्यांच्या व्हिडिओला बुधवारपर्यंत सुमारे सहा मिलीयन (60 लाख) व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा: MG ZS EV ला मिळतेय भारतीयांची पसंती; 2021 मध्ये 145% वाढली विक्री

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top