भगवान रामने जसं रावणाला हरवलं, तसं ब्रिटन कोरोनाला हरवेल- पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 8 November 2020

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशातील हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लंडन- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशातील हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बोरिस यांनी यावेळी म्हटलं की, ज्या प्रमाणे भगवान राम आणि सीता यांनी रावणाला हरवले होते, त्या प्रमाणे आपण कोरोना विषाणूला हरवू या. येत्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, पण मला विश्वास आहे की सर्व देशवासी मिळून कोरोनाला हरवतील.

बोरिस जॉन्सन यांनी 'आय ग्लोबल दिवाळी महोत्सव 2020' या कार्यक्रमाचे व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, देशातील लोक एकजुटीने आणि दृढ इच्छाशक्तीने कोरोना विषाणूचा सामना करतील. आपण सर्वजण मिळून कोरोना महामारीवर मात करु. दिवाळी हा उत्सव आपल्याला शिकवण देतो की, नेहमी अंधारावर प्रकाशाचा विजय होतो. अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगलेपणाचा विजय होतो. त्याचप्रमाणे आपण कोरोनावर विजय मिळवू. 

राम मंदिर निकालाची वर्षपूर्ती साजरी करण्यास मनाई; अयोध्येतील सर्व कार्यक्रम रद्द

भगवान राम आणि त्यांच्या पत्नी सीता देवी राक्षस रावणाला हरवल्यानंतर आपल्या घरी परतले होते. त्यांच्या या उपलब्धीमुळे लाखो दिवे लावण्यात आले होते, त्याप्रमाणे आपणही आपला मार्ग शोधून काढू शकतो आणि विजय प्राप्त करु शकतो, असंही बोरिस जॉन्सन म्हणाले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना दिवाळी साजरी केली जाणार आहे. 

ब्रिटन पंतप्रधानांनी यावेळी भारतीय समुदायाचे कौतुक केले. मला माहिती आहे की दूरुन उत्सव साजरा करणे अवघड आहे. सर्व कुटुंबीय एकत्र असताना असं करणं अधिक कठीण आहे. आपल्या मित्रांकडे, ओळखीच्या माणसांकडे जाऊन दिवाळीचे सेलिब्रेशन केले जाते. पण, यावेळी सर्वांना खबदारी घेऊन उत्सव साजरा करावा लागणार आहे, असं ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Britain prime minister boris johnson said about bhagwan ram