प्रिन्स हॅरीला मिळाली नोकरी; 'वर्क फ्रॉम पॅलेस'ची मुभा!

Prince_Harry
Prince_Harry

लंडन : ब्रिटनच्या राजघराण्यापासून दूर राहणाऱ्या प्रिन्स हॅरीने आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं आहे. त्याने आता नवीन करिअर सुरू करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. नोकरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रिन्स हॅरीची अमेरिकेतील एका कोचिंग आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील एका कंपनीत नोकरी मिळाली. या कंपनीचा चीफ इम्पॅक्ट ऑफिसर म्हणून प्रिन्सची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेटरअप या कंपनीने या कामासाठी प्रिन्सला किती पगार दिला आहे किंवा किती तास काम करावे लागेल, याबाबतचा कोणताही खुलासा केलेला नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, जगभरात वेगाने वाढणार्‍या कोरोना विषाणूमुळे प्रिन्स हॅरी या कंपनीसाठी 'वर्क फ्रॉम पॅलेस' करणार आहेत.

ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन' यांच्या वृत्तानुसार, प्रिन्स हॅरी सध्या कॅलिफोर्नियामध्ये राहत आहे. त्यामुळे ते तेथील पॅलेसमधूनच कामकाज पाहणार आहे. कॅलिफोर्नियात प्रिन्सचे १४५०० चौरस फूट जागेत एक आलिशान पॅलेस आहे. प्रिन्स आपल्या पत्नी मेगन मर्केल आणि २२ महिन्यांच्या मुलासोबत राहत आहेत. या भव्य पॅलेसमध्ये एकूण ९ खोल्या आहेत. याशिवाय येथे १६ बाथरूम आहेत. ५ एकरात पसरलेल्या या पॅलेसमध्ये स्विमिंग पूल, प्ले ग्राउंड आणि टेनिस कोर्टही आहे.

बेटरअप विषयी
बेटरअप कंपनीची स्थापना २०१३ मध्ये एक हेल्थ टेक स्टार्टअप कंपनी म्हणून झाली होती. या कंपनीची एकूण उलाढाल १२५५६ कोटी रुपये आहे. कंपनीत २०० हून अधिक कर्मचारी आणि दोन हजाराहून अधिक प्रशिक्षक काम करत आहेत. बेटरअप अमेरिकेतील नासा, मार्स, वॉर्नर मीडिया आणि शेव्हरॉन यांसारख्या जगभरातील अनेक नावाजलेल्या कंपन्यांना सेवा पुरवते. 

दरम्यान, प्रिन्स हॅरीने या नव्या जबाबदारीबद्दल एक ब्लॉगदेखील लिहिला आहे. प्रिन्स म्हणतो की, बेटरअप टीममध्ये सामील झाल्याने मला आनंद झाला. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आपण आपल्या आत असलेल्या नवीन संधी आणि सामर्थ्याला अनुभवू शकतो, असा माझा विश्वास आहे. 

मला हॅरी म्हणा
प्रिन्स हॅरीने बेटरअपच्या टीमला मला फक्त हॅरी म्हणूनच हाक मारा, अशी विनंती केली आहे. कोणत्याही शाही पदव्या, मानपानाशिवाय इतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे माझ्याशी बोलावे. यामुळे सर्वच गोष्टी सुलभ होतील, असं प्रिन्सचं म्हणणं आहे. 

तत्पूर्वी, प्रिन्स हॅरीने काही दिवसांपूर्वी ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो मेगनसोबत राजघराणं सोडून कॅलिफोर्नियाला आला, तेव्हा त्याच्या परिवाराला मिळणारी आर्थिक मदत रोखण्यात आली होती. प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचं निधन झालं, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांसाठी एक कोटी तीस लाख पौंडची व्यवस्था केली होती. या मुलाखतीत प्रिन्स हॅरी आणि मेगनने वंशद्वेष आणि जन्माला येणाऱ्या बाळाच्या रंगावरून राजघराण्याने व्यक्त केलेली चिंता असे अनेक गौप्यस्फोट केले. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com