राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बायडेन यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स; चीन-ट्रम्प यांना दिला इशारा

US_Joe_Biden
US_Joe_Biden

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी (ता.२५) पहिल्यांदाच पत्रकार परिषद आयोजित केली होती. अमेरिकेतील कोरोनाबाबतची सद्यस्थिती, लसीकरण, चीन आणि उत्तर कोरियाशी असलेले संबंध आणि २०२४मध्ये होणारी निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर त्यांनी मनमोकळा संवाद साधला. पदभार स्वीकारल्यानंतर १०० दिवसातच बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना २० कोटी कोरोना लस द्यायची शपथही घेतली. कोरोनाच्या साथीचा अमेरिकेला सर्वात जास्त फटका बसला आहे. तेथे कोरोनाग्रस्तांची तसेच त्यामुळे दगावलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. 

जिनपिंग यांच्याशी दोन तास चर्चा
पदभार स्वीकारल्यानंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी दोन तास चर्चा केल्याचे बायडेन यांनी उघड केले. अमेरिकेला संघर्ष नको आहे, पण आपल्यातील स्पर्धा कठीण असेल. चीनने आंतरराष्ट्रीय नियम पाळलेच पाहिजेत. तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या सन्मान राखला पाहिजे. तसेच तैवान आणि दक्षिण चीन समुद्रासह अन्य गोष्टींबाबत चीनला जबाबदार ठरवले जाईल, असंही बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावलं आहे.

... तर उत्तर कोरियाला जशास तसे उत्तर
बायडेन पुढे म्हणाले की, उत्तर कोरियाने आपल्या अणू चाचण्यांवर नियंत्रण आणलं नाही, तर अमेरिका शांत बसणार नाही. उत्तर कोरियाच्या हरकतींमुळे अमेरिकेने मित्रराष्ट्रांशी सल्लामसलत सुरू केली आहे. कोणत्याही प्रकारच्या मुत्सद्देगिरीसाठी अमेरिका तयार आहे, पण हे सर्व डिन्यूक्लरायजेशनच्या अंतिम निकालावर अवलंबून आहे. 

फक्त लढ म्हणा
माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, याबाबत बायडेन यांना विचारले असता त्यांनी हसून उत्तर दिलं. बायडेन म्हणाले की, मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला खूप मिस करत आहे. मीही २०२४ची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी, असं मला वाटत आहे.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com