Israel-Hamas: 'तुमच्यासोबत असल्याचा अभिमान आहे'; जो बायडेननंतर आता ऋषी सुनक पाठिंबा द्यायला इस्राइलमध्ये

Israel-Hamas
Israel-Hamas

तेल अवीव- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी इस्राइलला भेट दिली होती. त्यानंतर आज गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्राइलला भेट दिली. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची भेट घेत त्यांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. तसेच तुमच्यासोबत असल्याचा अभिमान असल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी ऋषी सुनक आणि नेतान्याहू यांच्यामध्ये एक बैठकही पार पडली.

ऋषी सुनक यावेळी म्हणाले की, इस्राइलवर झालेल्या हल्ला पाहून मला वाईट वाटलं. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्राइलचे नागरिक मोठ्या संकटातून आणि दु:खातून जात आहेत. ब्रिटिश नागरिक या कठिण वेळी इस्राइलसोबत आहेत. इस्राइलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्याला हमासला संपवावं लागेल.

Israel-Hamas
Israel-Hamas War: अमेरिकेकडून गाझासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर; इस्राइल दौऱ्यादरम्यान बायडेन यांची घोषणा

हमासच्या अतिरेकामुळे पॅलेस्टाईनचे नागरिक देखील पीडित आहेत. इस्राइलने मानवतावादी मदत गाझा पट्टीमध्ये मिळावी यासाठी दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करतो. असा निर्णय नेतान्याहू यांनी घेतल्याबद्दल मी आनंदी आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. इस्राइलने हे युद्ध जिंकावं असं आम्हाला वाटतं, असं ऋषी सुनक म्हणाले.

बेंजामीन नेतान्याहू यांनी ऋषी सुनक यांचे देशात स्वागत केले. तसेच पाठिंब्याबाबत त्यांचे आभार मानले. हे युद्ध केवळ आमचं नाही तर संपूर्ण जगाचं हे युद्ध आहे. हा आपला सर्वात वाईट काळ आहे. जगाचाही हा वाईट काळ आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल, असं नेतान्याहू म्हणाले.

Israel-Hamas
Israel Hamas War: इस्राइल हमास युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या कंपनीने इस्राइलमधील व्यवसाय बंद केला

हमासने ७ नोव्हेंबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलने प्रतिहल्ला सुरु केला असून विध्वंस सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीत आतापर्यंत ३५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, तर किमान दहा हजार लोक जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com