बर्फाच्या चादरीखाली 'गोठला' ब्रिटन; थंडीने मोडला २५ वर्षांचा रेकॉर्ड

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 12 February 2021

ब्रिटनमधील थंडीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

लंडन- ब्रिटनमधील थंडीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. स्कॉटलंडमध्ये बुधवारी रात्री २५ वर्षानंतरच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. संपूर्ण ब्रिटेनमध्ये सध्या भयानक थंडी पडली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार ब्राईमरमध्ये तापमान मायनस २३ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. ब्रिटेनमध्ये २५ वर्षानंतर इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या एका दशकात पहिल्यांदा तापमान मायनस २० डिग्रीच्या खाली गेले आहे. बचावकार्यातील सदस्यांचे म्हणणं आहे की, स्कॉटलंडमध्ये सर्वत्र बर्फ पसरले आहे. 

चीनच्या सैन्य वापसीची प्रचंड गती, २०० रणगाडे घेतले मागे; भारतीय लष्करही...

हवामान विभागाच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन दिवस ब्रिटनमध्ये भयंकर थंडी पडेल, तसेच देशात बर्फवृष्टीचा धोका आहे. त्यांनी सांगितलं की ब्रिटेनमध्ये २३ डिसेंबर २०१० ला तापमान मायनस २० डिग्रीच्या खाली गेलं होतं. तज्ज्ञांनी संपूर्ण ब्रिटनमध्ये बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे, तसेच वीज जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच देशातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितलं की, थंडीच्या हवामानामुळे प्रवासामध्ये अडथळा येऊ शकतो. कडक थंडीचा सर्वाधिक प्रभाव स्कॉटलंडच्या पूर्व भागात, इंग्लंड, देवोन आणि दक्षिण-पश्चिम वेल्समध्ये आहे. काही भागांमध्ये उन पडू शकते, त्यामुळे वातावरण उत्साहवर्धन वाटू शकतं. 

देशात तापमानाचा पारा घसरला, हवामान विभागाने दिला इशारा

याआधी मंगळवारी रात्री स्कॉटिश हाईलँड्सवर पारा मायनस १७.१ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. तसेच ब्रिटेशची शहरे मॅनचेस्टर आणि कारकिस्लेमध्ये पारा गुरुवारी मायनस ४ डिग्रीपर्यंत पोहोचला होता. यार्क शहरामध्ये तापमान ६ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. काही भागामध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने लोकांना इशारा दिलाय की त्यांनी थंडी संपेपर्यंत अतिरिक्त सावधानी बाळगावी. रविवारपर्यंत तापमान अधिक खराब होऊ शकतं. हुडहुडी बसवणारी थंड हवा वाहू शकते. त्यामुळे बर्फवृष्टीचा धोका अधिक राहील. यादरम्यान पाऊस पडू शकतो.

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर ते राहुल गांधींचा PM मोदींवर आरोप, वाचा... 

थंडीच्या दिवसामध्ये सर्वाधिक अडचण बेघर लोकांना होणार आहे. असे असले तरी अनेक संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. अशा लोकांवा जेवण, दूध, पांघरुन आणि झोपण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. तसेच देशातील कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता ब्रिटनच्या आरोग्य विभागाने जाहीर केलंय की देशातील कोविड लस केंद्रे सुरु राहतील. वाईट हवामानामुळे ब्रिटेनच्या अनेक शहरांमध्ये कचरा गोळा करण्याचे काम थांबले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना फुटपाथवरील बर्फ हटवणे आणि मेडिकल सेंटरपर्यंत रस्ता साफ करण्याच्या कामाला लावण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brittan UK records its coldest temperature since 1995