बारा शालेय मुलींना पाकिस्तानात जाळले 

पीटीआय
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टीस्तानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी एका शाळेच्या 12 मुलींना जाळले. या घटनेनंतर येथील संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेची मागणी केली, असे वृत्त येथील प्रसार माध्यमांनी आज दिले आहे. 

कराची : पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टीस्तानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी एका शाळेच्या 12 मुलींना जाळले. या घटनेनंतर येथील संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेची मागणी केली, असे वृत्त येथील प्रसार माध्यमांनी आज दिले आहे. 

गिलगिटपासून 130 किमीवर असलेल्या चिलास गावात ही शाळा आहे. या शाळेला काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य करीत शाळेच्या संपत्तीचे नुकसान केले. दोन शाळांमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त जिओ वाहिनीने दिले आहे. आतापर्यंत अनेकदा दहशतवाद्यांनी विविध शाळांना आपले लक्ष्य केले आहे. या घटनेशी संबंधितांना तातडीने अटक करावी आणि शैक्षणिक संस्थांना सुरक्षा पुरवावी, या मागण्यांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burning twelve school girls in Pakistan