
बस आणि तेल वाहून नेणारे टँकरच्या धडकेत 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
कॅमरुन- कॅमरुन देशात भीषण रस्ते अपघात झाला आहे. बस आणि तेल वाहून नेणारे टँकरच्या धडकेत 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 21 लोक गंभीर जखमी झाल्याचे कळत आहे. कॅमरुन हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. देशाच्या पश्चिम भागात एका खेड्यात हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
एक टँकर बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेत होते. त्यावेळी या टँकरने बसला जोराची धडक दिली. धडकेमुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतली. बसमध्ये असलेल्या लोकांना काही कळण्याआधीच आग लागली होती. यात मोठ्या संख्येने लोक ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
Viral Video: 'तुम्ही मला सोबत का नेलं नाही?' एकट्याने कोरोना लस...
70 प्रवाशांना घेऊन जाणारी बस आपल्या मार्गाने जात होती. यावेळी टँकरने बसला जोराची धडक दिली. ट्रक बेकायदेशीर तेल घेऊन जात होता. यावेळी बसमध्ये असलेल्या अनेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच काही गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रात्री झाला अपघात
रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. अपघात नेमका कसा झालं, याबाबत स्पष्ट काही सांगण्यात आलं नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. दरम्यान, 20 पेक्षा अधिक लोक होरपळले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.