
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील बालकासर इंटरचेंजजवळ बस दरीत कोसळल्याने नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले. चकवाल रेस्क्यू ११२२ च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बस इस्लामाबादहून लाहोरला जात असताना इस्लामाबाद-लाहोर मोटरवे (एम२) वरील बालकासर इंटरचेंजजवळ तिचा एक टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस खड्ड्यात पडली आणि उलटली.