Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

Call of Duty creator Vince Zampella dies in a tragic Ferrari accident : सुसाट फेरारी जोरदार धडकली अन् दुसऱ्याच क्षणी पेटली; अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Vince Zampella, the legendary Call of Duty creator, who reportedly died in a tragic Ferrari accident, leaving the global gaming community in shock.

Vince Zampella, the legendary Call of Duty creator, who reportedly died in a tragic Ferrari accident, leaving the global gaming community in shock.

esakal

Updated on

Call of Duty creator Vince Zampella Death  ‘कॉल ऑफ ड्यूटी’ हा प्रसिद्ध व्हिडिओ गेम तयार करणारे गेम डेव्हलपर विन्स झॅम्पेला यांचे अपघाती निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या फेरारीचा दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एंजेलिस क्रेस्ट हायवेवर भीषण अपघात झाला. प्रचंड वेगातील फेरारी त्यांची कार रस्त्यावरून घसरून थेट रस्त्यालगतच्या  काँक्रीटला जोरदार धडकली आणि क्षणातच पेटली.

या भयानक अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये फेरारी किती प्रचंड वेगात होती आणि कशाप्रकारे धडकली आणि पेटली हे दिसते. हा भीषण अपघात घडला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचा लोकांचा आरडाओरडाही व्हिडिओमध्ये ऐकू येतो. अपघात घडल्यानंतर तत्काळ या लोकांना अपघातग्रस्त फेरारीकडे धाव घेतली आणि कारमधील व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

प्राप्त माहितीनुसार अपघाताच्या वेळी कारमध्ये दोन लोक होते. मात्र अपघात इतका भीषण होता की विन्स झॅम्पेला यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा प्रवाश गंभीर जखमी झाला होता, त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Vince Zampella, the legendary Call of Duty creator, who reportedly died in a tragic Ferrari accident, leaving the global gaming community in shock.
Congress on Thackeray Brother alliance ...म्हणून काँग्रेसने राज अन् उद्धव ठाकरेंच्या युतीत सामील होण्यास दिला नकार!, वडेट्टीवारांनी नेमकं कारणच सांगितलं

ही अपघाताची बातमी व्हिडिओ गेम्सच्या जगातासाठी अतिशय दुःखद आहे.  अपघाताचे नेमके कारण, अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याबाबत तपास करत आहेत. तर या घटनेनंतर, इलेक्ट्रॉनिक आर्ट्स (EA) ने विन्स झॅम्पेला यांच्या निधनाची पुष्टी करणारे अधिकृत निवेदन जारी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com