Congress on Thackeray Brother alliance ...म्हणून काँग्रेसने राज अन् उद्धव ठाकरेंच्या युतीत सामील होण्यास दिला नकार!, वडेट्टीवारांनी नेमकं कारणच सांगितलं

Vijay Wadettiwar Reveals Reasons Behind Congress Stand : जाणून घ्या, काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीबाबत नेमका काय निर्णय घेतला आहे?
Raj Thackeray, Uddhav Thackeray and Vijay Wadettiwar

Raj Thackeray, Uddhav Thackeray and Vijay Wadettiwar

esakal

Updated on

Congress refuses to join the Raj Thackeray–Uddhav Thackeray alliance : आगामी महापालिका निवडणुकीसाठी विशेष करून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती निश्चित झाली आहे. तर काँग्रेसने या युतीत सामील होण्यास नकार दर्शवला आहे. काँग्रेस हायकमांडने दिल्लीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत जाण्यास नेमका का नकार दिला? याचे कारण, आता समोर आले आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाच्या या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले की, '‘समविचारी पक्षांसोबत युती करणे हे आमचे धोरण आहे. मनसे आमच्या विचारसरणीच्या विरुद्ध आहे, म्हणून आम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीत सामील होणार नाही. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, आम्ही प्रादेशिक किंवा भाषिक आधारावर भेदभाव करू शकत नाही.'’

याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार याचीही वडेट्टीवार यांनी माहिती दिली. मुंबई महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून लढवण्याबाबत चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे, असं ते म्हणाले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray and Vijay Wadettiwar
Sheikh Hasina Statement : बांगलादेशात हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेवर शेख हसीना म्हणाल्या, ‘’हे तेच लोक आहेत का?, ज्यांना...’’

तसेच आज महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे. ही यादी आढावा बैठक आणि रणनीतीवरील सविस्तर चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आली.

Raj Thackeray, Uddhav Thackeray and Vijay Wadettiwar
Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज उर्फ ​​बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री चव्हाण, राजस्थान सचिन पायलट, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्य नाना पटोले यांच्यासह अन्य जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com