Cambodia hotel fire : जीव वाचवण्यासाठी लोकांनी घेतल्या पाचव्या मजल्यावरुन उड्या, पहा थरारक Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cambodia hotel fire

Cambodia hotel fire : जीव वाचवण्यासाठी लोकांनी घेतल्या पाचव्या मजल्यावरुन उड्या, पहा थरारक Video

कंबोडिया येथील हॉटेल ग्रॅंड डायमंड सिटीला  भीषण आग लागली आणि या आगीत आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत तर ३० जण जखमी आहे. सध्या या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अशातच एक थरारक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. (Cambodia hotel fire video goes viral people jumping from 5th floor of hotel for saving life)

कंबोडिया येथील हॉटेल ग्रॅंड डायमंड सिटीला आग लागताच हॉटेलमधील लोकांची पळापळ सुरू झाली. परिस्थिती इतकी आवाक्याबाहेर होती की लोकांनी जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान केले. असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्या व्हिडीओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी चक्क पाचव्या मजल्यावरुन उड्या मारताहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येणार.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आगीने खूप थरारक रुप धारण केलेले आहेत. आगीपासून वाचण्यासाठी लोक पाचव्या मजल्यावर काठावर उभे आहेत पण तरीसुद्धा आग वाढत असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी लोक पाचव्या मजल्यावरुन उड्या मारताहेत.

सदर घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य ३० जण जखमी आहे. या घटनेसंबंधीत व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी रोष व्यक्त करत आहे.