Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government of Canada Travel Advisory

कॅनडानं भारतात मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवलीय.

Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला

कॅनडानं भारतात मोठे दहशतवादी हल्ले (Terrorist Attacks) होण्याची शक्यता वर्तवलीय. याबाबत कॅनडा सरकारनं भारतात जाणाऱ्या प्रवाशांना ठराविक भागात न जाण्याचा सल्ला दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडानं आपल्या नागरिकांना गुजरात, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील सर्व भागात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

कॅनडा सरकारच्या (Canada Government) माहितीनुसार, पाकिस्तानला (Pakistan) लागून असलेल्या भारतीय राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. कॅनडा सरकारच्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये म्हटलंय की, लँडमाइन्स आणि स्फोटकांव्दारे भारतात हल्ले घडवले जाऊ शकतात. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगावी. कॅनडानं आपल्या नागरिकांना गुजरात, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील प्रवास टाळण्याचं आवाहनही केलंय. पाकिस्तानच्या सीमेपासून 10 किमीच्या आत असलेल्या भागात सुरक्षितता आणि सर्व नागरी प्रवासाची चिंता आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: PFI बंदीनंतर 'या' राजकीय पक्षावर कारवाई होणार? SDPI निवडणूक आयोगाच्या रडारवर

27 सप्टेंबरच्या रात्री कॅनडा सरकारनं ही सूचना जारी केली होती. यामध्ये भारताच्या अनेक भागात दहशतवादी हल्ल्याचा धोका व्यक्त करण्यात आला होता. यात लडाखचा उल्लेख नसला तरी, या इशाऱ्यात कॅनेडियन वंशाच्या लोकांना दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या धोक्यामुळं आसाम आणि मणिपूरमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा: PFI च्या ट्विटर अकाउंटवरही बंदी; सरकारच्या तक्रारीनंतर 'ट्विटर इंडिया'ची मोठी कारवाई

तर, 23 सप्टेंबर रोजी भारत सरकारनं एक सूचना जारी करून कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना द्वेषपूर्ण गुन्हेगारी आणि भारतविरोधी कारवायांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. यानंतर, कॅनड सरकारनं विनाकारण हा इशारा जारी केल्याचं मानलं जात आहे, जेणेकरून भारताच्या वक्तव्याला छेद दिला जाऊ शकतो, असंही बोललं जात आहे.