चीनशी युद्ध करू शकत नाही - रॉड्रीगो ड्युटेर्टे

rodrigo-duterte
rodrigo-duterte

मनीला - सागरी क्षेत्रावरील चीनचे दावे खोडून काढण्यासाठी आपण संघर्ष करू शकत नाही, कारण त्यासाठी एकच पर्याय म्हणजे युद्ध, जे आपण करू शकत नाही, असे फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो ड्युटेर्टे यांनी म्हटले आहे.

ड्युटेर्टे यांनी देशाला उद्देशून वार्षिक भाषण केले. त्यावेळी त्यांनी चीनविषयक मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले की, कायमस्वरूपी लवादाने 2016 मध्ये फिलिपीन्सच्या बाजूने निकाल दिला होता, पण आपले सरकार त्याच्या अंमलबजावणीसाठी दबाव आणू शकत नाही, केवळ  राजनैतिक मार्गांनी प्रयत्न करणे आपल्या हातात उरते. चीनच्या ताब्यात क्षेत्र आहे, ज्याविरुद्ध लष्करी पातळीवर आव्हान देण्याची क्षमता आपल्याकडे नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसर्ग रोखला
दरम्यान, मार्च महिन्यात स्थानिक रुग्ण मिळण्यास सुरवात होताच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्यामुळे सुमारे 13 ते 35 लाख जणांना संसर्गापासून वाचविता आल्याचा दावाही त्यांनी केला.

जगात सर्वाधिक कालावधीचे आणि सर्वांत कडक लॉकडाऊन फिलीपीन्सने लागू केले. लॉकडाऊन मोडाल तर गोळ्या घालू असा इशाराच ड्युटेर्टे यांनी दिला होता. ते म्हणाले की, लॉकडाउनमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. चाचणी उपक्रम सुरु करण्यास सरकारला वेळ लागल्याचे मला मान्य आहे. सुरुवातीला त्यात अडथळे आले होते.  सोमवारी फिलीपीन्समधील रुग्णांची संख्या 82 हजार 40, तर मृत एक हजार 945 अशी आकडेवारी होती.

कोरोना संसर्गाचे आकडे आणखी बरेच कमी असले असते तर आपण केलेला त्याग सार्थ ठरला असता. तसा तो अजूनही सार्थच आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जीवनाला प्राधान्य आहे.
- रॉड्रीगो ड्युटेर्टे, फिलीपीन्सचे अध्यक्ष

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com