‘कॅपिटॉल’वरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण | Capitol Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Capitol
‘कॅपिटॉल’वरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण

‘कॅपिटॉल’वरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारचे केंद्र असलेल्या कॅपिटॉल हिल इमारतीवर तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) आणि इतर प्रमुख अधिकारी संसदेमध्ये या घटनेबाबत बोलणार असल्याचे ‘व्हाइट हाऊस’तर्फे (White House) आज सांगण्यात आले. काही नेत्यांनी मुलाखती देत लोकशाहीवर हल्ला करणाऱ्यांचा निषेध केला आहे.

गेल्या वर्षी सहा जानेवारीला निवडणुकीच्या अंतिम निकालाच्या दिवशीच कॅपिटॉल हिलमध्ये मतमोजणी सुरु असताना ट्रम्प समर्थकांनी इमारतीवर हल्ला करत निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला होता. यामुळे सिनेट सदस्यांनी मुख्य सभागृह सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या इमारतीत ट्रम्प समर्थक मोकाट फिरत होते. या घटनेबाबत काही सत्य घटनांवर प्रकाश टाकणार असल्याचे ‘व्हाइट हाऊस’तर्फे सांगण्यात आले आहे. लोकशाहीवर हल्ला झाल्याचा निषेध म्हणून संसदेत दोन मिनीट शांतताही पाळली जाणार आहे.

हेही वाचा: मोठा निर्णय! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढणार

डोनाल्ड ट्रम्प यांची पकड कायम

कॅपिटॉल हिलवरील हिंसाचारामुळे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टीकेचे धनी झाले असले तरी रिपब्लिकन पक्षावर अद्यापही त्यांची पकड कायम आहे. या पक्षाचे तेच प्रमुख नेते असून २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीसाठी पक्षातर्फे उमेदवारीसाठी त्यांचेच नाव आघाडीवर आहे. प्रायमरी निवडणुकीत पक्षातर्फे तेच प्रमुख प्रचारक आहेत. त्यामुळे पक्षातून त्यांना आव्हान न मिळाल्यास आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा एकदा मैदानात उतरू शकतात.

त्या दिवशी लोकशाहीचाच अंतिम विजय झाला. कारण, हिंसाचारानंतर सदस्यांनी पुन्हा एकत्र येत प्रक्रिया पूर्ण केली आणि बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

- नॅन्सी पेलोसी, सभापती, लोकप्रतिनिधीगृह

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :americaglobal news
loading image
go to top