

UAE Honour Ceremony for flydubai Crew
esakal
Captain Smit Machchhar Received Order of Zayed II : संयुक्त अरब अमिरातीने भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार आणि त्यांच्या फ्लायदुबई कर्मचारी वर्गाचा विशेष सन्मान केला आहे. दुबई ते तेल अवीवदरम्यान विमान प्रवासात झालेल्या हल्ल्याच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या धैर्याबद्दल मच्छार यांना ‘ऑर्डर ऑफ झायेद II (प्रथम श्रेणी)’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. या सन्मान सोहळ्यात कॅप्टन मच्छार यांच्या डोक्यावरील गंभीर दुखापतीच्या खुणा आणि टाके स्पष्टपणे दिसून आले. गंभीर जखमी होऊनही त्यांनी दाखवलेल्या धैर्याची सध्या चर्चा होत आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा