
Ceasefire: पहलगाम हल्ला आणि नंतर ऑपरेशन सिंदूरमुळं भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती सध्या तात्पुरत्या युद्धविरामामुळं नियंत्रणात आहे. पण हा युद्धविराम केवळ रविवार, १८ मेपर्यंतच लागू असल्याचं विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या या विधानामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्यावर भारताकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.