येशू ख्रिस्ताऐवजी माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करा

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा नवा फतवा 

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनने नाताळचे सेलिब्रेशन सुरू असताना वादग्रस्त फर्मान काढले आहे. जगभर नाताळ साजरा होत असताना या क्रूर हुकूमशहाने मात्र उत्तर कोरियातील नागरिकांना आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. किम यांची आजी जॉंग सूक यांचा जन्म 25 डिसेंबर 1919 मध्ये झाला. 

जेव्हा संपूर्ण जग 25 डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करते तेव्हा उत्तर कोरियाच्या जनतेवर क्रूर हुकूमशहाने मात्र आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करण्याची सक्ती केली. उत्तर कोरियाचा पहिला हुकूमशहा किम सुंग दुसरा यांच्या त्या पत्नी होत. त्याचबरोबर कम्युनिस्ट कार्यकर्त्या देखील होत्या. तेव्हा आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करावा यासाठी त्यांनी सगळ्यांवर सक्ती केली आहे.

किम जॉंगचे असले फतवे कोरियन नागरिकांना नवे नाही. त्याच्या विचित्र निर्णयांमुळे उत्तर कोरियातील 50 ते 70 हजार नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

स्वत:च्या मनाप्रमाणे रोज नवे निर्णय बदलण्यासाठी तसेच एक क्रूर हुकूमशहा म्हणून तो कुप्रसिद्ध आहे.जॉंग उन याने वडिलांच्या निधनांनंतर सर्व नागरिकांनी शोक करण्याचा आदेश काढला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला जी व्यक्ती रडणार नाही त्याला शिक्षा देण्यात ठोठावण्याचे फर्मानही त्याने काढले होते, अशी चर्चा रंगली. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये पराजित झालेल्या खेळाडूंना तो खाणीत सक्त मजूरीची शिक्षा देणार असल्याचीही चर्चा होती. 
 
Web Title: Celebrate birth of my grandmother instead of Christmas, North Korean dictator Kim Jon-un tells his country