पाकमधील जनगणना पुढे ढकलली

पीटीआय
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद - भारत-पाकिस्तानमधील तणावग्रस्त वातावरणामुळे सैन्यदलांची मदत मिळत नसल्याने पाकिस्तानमध्ये जनगणना अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

इस्लामाबाद - भारत-पाकिस्तानमधील तणावग्रस्त वातावरणामुळे सैन्यदलांची मदत मिळत नसल्याने पाकिस्तानमध्ये जनगणना अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

तब्बल 17 वर्षांनंतर ही जनगणना होणार होती. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रलंबित असलेली ही सहावी जनगणना आता कधी होणार, याबाबतही निश्‍चित माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली नाही. सरकारने जनगणनेसाठी सर्व तयारीही पूर्ण केली होती. मात्र, जनगणना सुरळीत पार पडण्यासाठी सरकारला वीस ते तीस हजार सैनिकांची आवश्‍यकता आहे आणि सीमेवरील तणाव वाढल्याने सैनिक उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये 1951, 1961, 1972, 1981 आणि 1998 मध्ये जनगणना झाली आहे.

Web Title: Census of Pakistan Postponded