

Central African Republic mining accident
esakal
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये एका दुर्दैवी घटनेत पश्चिम भागातील सोन्याची खाण उत्खननाचे काम सुरू असताना अचानक कोसळली. या वेळी तिथे कामगार उपस्थित होते आणि त्यापैकी किमान ३० जणांचा जागीच मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र त्यांची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नाना-मॅम्बरे प्रांतातील 'अब्बा' भागात घडली. घटनास्थळी असलेल्या कामगारांनी सांगितले की, खाणीचा एक भाग अचानक कोसळला; त्यानंतर सहकारी कामगार आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले.