एकेकाळी बॉडी शेमिंगची शिकार झाली होती 'मिस युनिव्हर्स हरनाज संधू'

Miss Universe 2021: मिस युन्हीव्हर्सचा मुकुट भारताकडे...
Harnaaz Sandhu
Harnaaz Sandhu Instagram

जगातील सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा असलेल्या मिस युन्हीव्हर्सचा किताब यंदा भारताना मिळवला आहे. चंदीगडच्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) हा मिस युनिव्हर्सचा किताम मिळवला असून, तब्बल २१ वर्षांनी हा मुकुट भारताकडे आला आहे. जगभरात सध्या हरनाजची चर्चा सरू असून, तिचा आता पर्यंतचा जाणून घेण्याची इच्छा अनेकांना आहे.

Harnaaz Sandhu
21 वर्षांनंतर भारताकडे 'मिस युनिव्हर्स'; हरनाज संधूने कोरलं नाव

हरनाज संधू मूळ चंदिगडची असून ती २१ वर्षांची आहे. हरनाज संधूने 'यारा दियां पौ बरन' आणि 'बाईजी कुटंगे' सारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. चंदीगडच्या एका शीख कुटुंबात वाढलेल्या हरनाजला लहानपणापासूनच फिटनेस आणि फॅशनमध्ये रस होता. तिने अनेक ब्युटी इव्हेंटमध्येही भाग घेतला आहे. हरनाजने २०१७ मध्ये 'टाइम्स फ्रेश फेस' या सौंदर्यस्पर्धेतून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. २१ वर्षीय हरनाज सध्या पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने 'फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९'चा किबातसुद्धा आपल्या नावे केला आहे. हरनाजने काही पंजाबी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Harnaaz Sandhu
Miss Universe 2021: हरनाज संधूच्या 'या' उत्तराने जिंकली परीक्षकांची मनं

मिळालेल्या माहितीनुसार शालेय दिवसांमध्ये सडपातळ बांध्यामुळे तिची खिल्ली उडवली जात होती. या गोष्टीमुळे हरनाज काही काळ नैराश्याच्या गर्तेत होती. मात्र, अशा वेळी घरच्यांनी तिला मदत केली. हरनाज सांगतले की मला खायला खूप आवडतं मात्र, त्याचबरोबर ती तिच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेते.

हरनाजने अगदी लहान वयातच यशाचं शिखर गाठलं होतं. 2017 चा मेबमिस चंदीगड अवॉर्ड जिंकल्यावर हरनाझ देशभरात चर्चेत आली होती. विशेष म्हणजे तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती. इथूनच तीच्या प्रवासाला सुरूवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com