esakal | अनोखी सफर! जिथे कधीच सूर्य मावळत नाही, अशी काही ठिकाणे

बोलून बातमी शोधा

अनोखी सफर! जिथे कधीच सूर्य मावळत नाही, अशी काही ठिकाणे
अनोखी सफर! जिथे कधीच सूर्य मावळत नाही, अशी काही ठिकाणे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिवस आणि रात्र हे आपल्या नित्यनियमाचे झाले आहेत. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र हे आपल्या सवयीचं झालं आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्याकारणाने दिवस-रात्रीची ही किमया आपल्याला अनुभवायला मिळते. मात्र, तुम्हाला जर असं म्हटलं की, पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी कधी रात्र होतच नाही. जिथे 24 तास सूर्यप्रकाश असतो आणि सूर्य कधीच मावळत नाही.

सूर्य कधीच न मावळण्याच्या या अपूर्व गोष्टीला 'द मिडनाईट सन' असं म्हटलं जातं. आर्क्टिक खडांच्या उत्तरेस आणि अंटार्क्टिक खंडाच्या दक्षिणेस स्थानिक उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये ही नैसर्गिक घटना घडते. जेव्हा ध्रुववस्थेत सूर्य क्षितिजाच्या खाली राहतो तेव्हा पोलर नाईट नावाची विचित्र घटना घडते.

ही आहे अशा काही ठिकाणांची यादी ज्याठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही.

नॉर्वे :

नॉर्वे देशाला 'मिडनाईट सन'चा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. नॉर्वेच्या उंचीमुळे तसेच दिवसा प्रकाशामधील काही कारणांमुळे या देशातील सूर्यप्रकाशाचा कालावधी बराच मोठा आहे. या देशात मेच्या उत्तरार्धापासून ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे सुमारे 76 दिवसांच्या कालावधीत सूर्य सुमारे २० तास मावळत नाही.

img

फिनलँड :

या देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाळ्याच्या वेळी 73 तास सूर्यप्रकाश पडतो आणि या देशातील नागरिकांना हिवाळ्यात सूर्यप्रकाश पहायला देखील मिळत नाही. 'मिडनाईट सन' आर्क्टिक वर्तुळाच्या वर चमकतो, परंतु येथे सूर्य क्षितिजाच्या पलिकडे बुडतो आणि नंतर पुन्हा उगवतो ज्यामुळे संपत चालेलली रात्र आणि पहाटेच्या दरम्यानच्या दोहोंमधल्या सीमा अस्पष्ट दिसतात.

img

स्विडन:

मेच्या सुरुवातीपासून ते ऑगस्टच्या उत्तरार्धापर्यंत, सूर्य मध्यरात्रीच्या सुमारास बुडतो आणि पुन्हा पहाटे चारच्या सुमारास उगवतो. या देशात निरंतर सूर्यप्रकाशाचा कालावधी वर्षाकाठी सहा महिन्यांपर्यंत असतो.

img

हेही वाचा: कोरोनाचा उद्रेक तरीही भारताने संयुक्त राष्ट्राची मदत नाकारली

अलास्का:

अलास्कामध्ये मे अखेरीस ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत सूर्य मावळत नाही. फेअरबँक्स, अलास्का आर्क्टिक सर्कलच्या दक्षिणेस आहे जिथे उन्हाळ्यातील सकाळी 12:30 वाजल्याच्या सुमारास सूर्यास्त होतो. कारण फेअरबँक्स आपल्या आदर्श वेळ क्षेत्राच्या तब्बल 51 मिनिटांच्या पुढे आहे.

img

कॅनडा :

इनुविक आणि वायव्य प्रदेशांसारख्या ठिकाणी सुमारे 50 दिवस सतत सूर्यप्रकाश पाहणारा कॅनडा हा दुसऱ्या क्रमांकाचा असा देश आहे. हा देश जवळपास वर्षभर बर्फाच्छादित अवस्थेत असतो.

img