Chh. Shivaji Maharaj : जपानमध्येही शिवरायांची पालखी मिरवणूक, वारकरी दिंडी अन् भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन

भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेने वारकरी दिंडी, लेझीमसह शिवरायांची पालखी मिरवणूक काढत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे मराठमोळे प्रदर्शन केले.
Chhtrapati Shivaji Maharaj In Japan
Chhtrapati Shivaji Maharaj In Japanesakal

Chhtrapati Shivaji Maharaj : जपानची राजधानी टोकियोमध्ये इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक आणि वारकरी दिंडी काढण्यात आली. टोकियो शहरामधील ओजिमा भागामध्ये, कोतो सिटीझन फेस्टिवल मध्ये ‘सांस्कृतिक देवाणघेवाण’ कार्यक्रमाअंतर्गत अनेक जपानी आणि परकीय संस्थांनी आप-आपल्या संस्कृतींचे दर्शन घडवले. त्यामध्ये भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेने वारकरी दिंडी, लेझीमसह शिवरायांची पालखी मिरवणूक काढत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे मराठमोळे प्रदर्शन केले.

मिरवणुकीमध्ये तब्बल 180 पेक्षा जास्त भारतीय सहभाग होता, त्यांनी 2 किमी पेक्षा जास्त लांब मिरवणूक काढत मिरवणूक बघणाऱ्या जपानी नागरिकांची मनेही जिंकली. भारतीय महापुरुष आणि देवांविषयीचे मिरवणुकीतील प्रदर्शन पाहून परिसरातील फक्त भारतीयच नाही तर विदेशी नागरिक, विशेषतः जपानी नागरिक भारावून गेले.

विठ्ठल रखुमाईच्या भजनांनी पावन झालेल्या टोकियोमधील वातावरणामध्ये, भारतीयांच्या उत्साहाने भरून गेलेल्या टाळ्या आणि भाषा समजत नसली तरी जपानी लोकांनी टाळ्या वाजवत भारतीयांचं कौतुक केलंय. "जय जय" काराने त्यात अजूनच भर पडली आणि मिरवणुकीला अजून गोडी आली.

Chhtrapati Shivaji Maharaj In Japan
Chhtrapati Shivaji Maharaj In Japan

सजवलेल्या पालखीत महाराजांची सुरेख मूर्ती, मावळ्यांच्या कपड्यातील पालखी वाहणारे, डोक्यावर विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, टाळ-मृदूंगाच्या तालावर नाचणारे वारकरी, नऊवारी साड्यांमधील महिला, पारंपरिक वेशभूषेतील मुले आणि पुरुष, वयस्कांबरोबरच लेझीम खेळणारी लहान मुले, लाठी-काठी प्रात्यक्षिक, असंख्य फेटे, तिरंगी झेंडे आणि भगवे झेंडे असे सर्व काही या मिरवणुकीत समाविष्ट करण्यात आले होते.

Chhtrapati Shivaji Maharaj In Japan
Chhtrapati Shivaji Maharaj In Japan

भारत कल्चरल सोसायटी संस्थेने छत्रपतींविषयी त्यांच्या जन्माआधीपासूनचा काळ ज्यात मुघल, निजामाचे राज्य ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयी माहिती जपानी भाषेमध्ये पत्रिका छापून मिरवणूक पाहण्यास आलेल्या जपानी नागरिकांना पोहोचवण्याचे कार्यही ह्या मिरवणुकीमधून केले.

Chhtrapati Shivaji Maharaj In Japan
Sant Tukaram Palkhi : संत तुकोबारायांच्या पालखीचे चौफुला, वाखारी येथे स्वागत

जपान सारख्या देशात जिथे नियम इ. प्रचंड कडक असताना अशी मिरवणूक काढण्याची स्थानिक पातळीवरून मिळालेली परवानगी, सरकारी यंत्रणा यांचे सहकार्य आणि पोलिसांनी त्यांचे बजावलेले कर्तव्यसुद्धा कौतुकास्पद होते.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या इतर सर्व भारतीय नागरिक आणि कार्यकर्ते यांचेही सहकार्य या मिरवणुकीच्या आयोजनामध्ये मध्ये लाभल्यामुळे जपान मधील पहिल्या वहिल्या मराठमोळ्या मिरवणुकीचे यशस्वी संयोजन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com