Chicago Shooting: अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना; शिकागोजवळ 7 जणांची हत्या, 23 वर्षीय संशयित अद्याप फरार

Chicago Shooting: शिकागोजवळ 7 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बंदूकधारी 23 वर्षीय संशयित अद्याप फरार आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Chicago Shooting
Chicago ShootingEsakal

अमेरिकेतील शिकागोजवळ दोन वेगवेगळ्या घरांमध्ये झालेल्या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती आज अधिकाऱ्यांच्या हवाल्याने समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, जोलिएट, इलिनॉयमधील वेस्ट एकर्स रोडच्या 2200 ब्लॉकमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबार करणारा संशयित सध्या फरार आहे. रोमियो नॅन्स असे त्याचे नाव आहे.

जोलिएटचे पोलिस प्रमुख बिल इव्हान्स यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, दोन घरांमध्ये (शिकागो शूटिंग) एकूण सात जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेतील संशयित २३ वर्षीय नॅन्स या घरांजवळ राहत होता.

Chicago Shooting
Ram Mandir : जगभरात श्रीरामाचा जयघोष! सुमारे 40 देशात साजरा झाला आनंदोत्सव

गोळीबारात 7 ठार

जॉलिएटचे पोलिस प्रमुख बिल इव्हान्स यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, दोन घरांमध्ये एकूण सात जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या घटनेतील संशयित २३ वर्षीय नॅन्स या घरांजवळ राहत होता. जॉलिएट पोलिस विभागाचे म्हणणे आहे की नॅन्स, हा संशयित धोकादायक आहे.

नॅन्स किंवा त्याच्या कारबद्दल कोणाला काही माहिती असल्यास, त्यांनी त्वरीत संपर्क साधावा असे पोलिसांनी सांगितले आहे.

Chicago Shooting
Pakistan Reaction: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानचा जळफळाट; प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हणाले, "सोहळ्याचा आम्ही..."

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढत आहेत

अमेरिकेत गोळीबाराची ही पहिली घटना नाही. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि बंदुकींच्या हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. अमेरिकन बंदूक हिंसाचाराच्या घटनांचा अहवाल देणाऱ्या गन वायलेन्स आर्काइव्हने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात आतापर्यंत गोळीबारात 875 हून अधिक मृत्यू झाले आहेत.

Chicago Shooting
Mexico First Ram Temple : अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com