मुलांनो! आई-बाबांसाठी घरी परता, एकटेपणा छळतोय त्यांना

वयस्कर नागरिकांना हवाय आधार
वयस्कर नागरिकांना हवाय आधार
Summary

मग टीव्हीवर आपण ऐकतो किंवा वर्तमानपत्रात वाचतो की वयस्कर दांपत्याच्या अंत्यसंस्काराला मुले उपस्थित राहू शकली नाहीत.

औरंगाबाद : जगभरात आज जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिन World Elder Abuse Awareness Day साजरा होत आहे. अवती-भवती आपल्याला आजी-आजोबा किती महत्त्वाचे आहेत, हे सतत ऐकायला मिळते. पण परिस्थिती बदलली आहे. मुलांना लहानाचे मोठे करायचे. पण आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची गरज असताना ती जवळ नसतात. कधी तरी या मुलांना आपल्या वयस्करी आई-बाबांविषयी काहीच का वाटत नाही. मग टीव्हीवर आपण ऐकतो किंवा वर्तमानपत्रात वाचतो की वयस्कर दांपत्याच्या अंत्यसंस्काराला मुले उपस्थित राहू शकली नाहीत. 'हेल्पेज इंडिया' HelpAge India या संस्थेने मुंबई Mumbai, दिल्ली Delhi, कोलकाता Kolkota, चेन्नई Chennai, हैदराबाद Hyderabad आणि बंगळूरु Bengaluru या शहरांमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिनानिमित्त सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात ज्येष्ठांना आता एकटेपणा छळू लागला असल्याचे पुढे आले आहे. कोरोनामुळे वृद्धाश्रमात भेटी, कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे काय करावे, कुठे जावे हे प्रश्न ज्येष्ठांना छळत आहेत.Children Should Take Care Of Their Elder Parents

वयस्कर नागरिकांना हवाय आधार
'भगवान रामचा वापर केवळ राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी'

मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होतेय का?

टाटा ट्रस्ट Tata Trusts, समर्थ Samarth आणि संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी (युएनपीएफ) United Nations Population Fund ज्येष्ठांना मिळत असलेल्या सुविधांवर एक अभ्यास केला. त्यात असे दिसले की भारतात ज्येष्ठांची काळजी हा विषय आताही दुर्लक्षित आहे. त्यांच्या विकासाची आता प्राथमिक अवस्था असल्याचे निरीक्षण अभ्यासात नोंदविले आहे. वृद्धाश्रमात पाच महत्त्वाच्या क्षेत्रांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. जसे की पायाभूत सुविधा, शारीरिक निकड, संरक्षण व सुरक्षा, मान, सोयीसुविधांचे व्यवस्थापन आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com